Skip to main content

समोसे में आलू

समोसे में आलू... 

आटपाट नगराचा राजा कुणी बनायचं यावर चर्चा चाललेली असताना अचानक चर्चेतल्या नावांना बाजूला सारून आणि विरोधकांचं शिरकाण करून एखादा नवीनच राजा उद्याला येतो... सगळीकडे त्याचं गुणगान सुरू असतं. सर्वांत ताकदवर राजा कुणीही विरोधक शिल्लक नाही अशा वेळी हा राजा आपल्या मित्रांना पण भाव द्यायला तयार नसतो. अशा वेळी चिंध्या-चिध्या उडालेल्या विरोधकांतील एक सरदार राजाला न मागीतलेला पाठिंबा देतात. या सरदाराच्या सैन्यातल्या प्रमुख शिलेदारांवर अन्यायी- जुलुमी- भ्रष्टाचारी म्हणून आरोप झालेले असतात. तरी सुद्धा राजाला ममत्व भावना निर्माण होते आणि राजा या पराभूत सरदाराला आपला गुरू मानतो. गुरू सरदार मोठ्या मनाने झालेला पराभव, पडझड, नुकसान यासाठी राजाला माफ करत राजाला आपलं म्हणतो. आणि राजाचं राज्य सुरू होतं. 

इथे पराभूत झालेल्या इतर सरदारांना खूप आश्चर्य वाटतं. ते गुरू सरदारा कडे येतात आणि विचारतात की तुम्ही आता राजा सोबत आहात का.. गुरू सरदार थोडंसं हसतात. पराभूत सैन्यातील इतर सरदारांच्या पाठिवर हात फिरवून सांगतात. राजाला मार्गदर्शनाची गरज असते अधेमधे. बाकी मी पराभूत झालेला असलो तरी सत्ते सोबत जाणार नाही. मी तुमच्या सोबतच आहे. आपण राजाच्या विरोधात लढलं पाहिजे. राजाचा मुकाबला केला पाहिजे. राजाच्या विरोधात उभं राहण्यासाठी तयारी करा मी सर्वांत पुढे असेन... इथं गुरू सरदारांच्या सैन्याला वाटतं चला पराभूत झालो तरी अच्छे दिन आले. ते खूष असतात. तितक्यात गुरू सरदारांच्या सैन्यातल्या कलंकीत शिलेदारांची धरपकड सुरू होते. गुरू सरदार म्हणतात यामुळे घाबरायचं कारण नाही. 
गुरू सरदारांनी सांगीतलं म्हणून त्यांचं पराभूत सैन्य शांत होतं. शिलेदार पण सुटणार. आणखी अच्छे दिन येणार. पण मध्येच हे काय इतर पराभूत सरदारांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तयारी करण्याचे आदेश ही येतात. राजाला मार्गदर्शन करता करता राजा सोबत लढायचं पण.. सर्व शिलेदार भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगीतलेल्या गीतेचे सर्व अध्याय चाळायला लागतात. राजाने एव्हाना गीतेला राष्ट्रीय ग्रंथ बनवायची तयारी सुरू केलेली, त्यामुळे राजाने काही पानं तर गहाळ केली नाहीत ना हे पाहण्यासाठी पुतणे शिलेदार बाहेर भटकत असतात. तेव्हढ्या वेळात गुरू शिलेदार उत्तरेकडे जाऊन बिहारच्या सिंहासनावर बसण्याच्या तयारीत असलेल्या पराभूत सरदारांशी हातमिळवणी करतात. पुतणे शिलेदारांच्या मतीचे बाराच वाजतात. 
इकडे बाकीचे शिलेदार गट-तट विसरून असलेली- नसलेली कूटनितीची सर्व पुस्तक सर्व भुजांतील बळ एकवटून उचलून आणतात. पण गुरू सरदारांच्या एकंदरीतच कृतीमागचं गुपीत कळलं नाही. आपण अडाणी असल्याचं मान्य करून सर्व शिलेदार पुन्हा गुपचुप गुरू सरदारांचा आदेश मानण्यासाठी सज्ज होतात. ही कहाणी असेच अनेक अगम्य वळणं घेत पुढे सुरू राहते... 
तुम्ही या कहाणीतल्या पात्रांच्या अस्तित्वात असलेल्या लोकांशी साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न सुरू केला असेलच. गंमतीशीर वाटत असली तरी कहाणी अगदी खरी आहे. अस्तित्वात असलेल्या लोकांशी तर थेट संबंध आहेच आहे. निवडणूकीतील जोरदार पराभवानंतरही सध्या विरोधी पक्षांमधील ज्या काही लोकांची चर्चा जास्त होते त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांचं नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अनेकांना शरद पवारांची नेमकी भूमिका काय आहे हेच समजत नाही आणि त्याचमुळे शरद पवारांवर वेगवेगळ्या अंगाने टीका होत असते. शरद पवारांची भारतीय जनता पक्षासोबत असलेली जवळीक चर्चेचा विषय बनतो, मात्र हेच शरद पवार अनेकदा शिवसेनेच्याही जवळ असतात. संपूर्ण देशात दोन अंकी खासदारही मिळवू न शकलेला पक्ष एवढा चर्चेत का हा मोठा प्रश्न आहे. उलट- सुलट भूमिकांमुळे चर्चेत राहणं वेगळं आणि राजकीय महत्व अबाधित ठेवणं वेगळं हे ही समजून घेतलं पाहिजे. सरद पवारांना आपल्या छोट्याश्या पक्षाचं राजकीय महत्व अबाधित ठेवण्याचं गणित चांगलंच जमलंय. हे गणित जमवता जमवता अनेक प्रश्न निर्माण होतात. राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका काय शरद पवार घेतील तीच भूमिका, या समिकरणाच्या बाहेर पक्ष येणार आहे की नाही. सामान्य कार्यकर्ता अशा अनेक प्रश्नांखाली दबलेला आहे. 
लोकसभा निवडणूकीआधी पासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका बनवायला सुरूवात केली होती. सरकार येणार नाही हे गृहीत धरून भारतीय जनता पक्षाला किती जागा कमी पडतील इथपासून जास्त जागांची गरज लागली तर इतर पक्षांशी बोलणी करून बहुमताचा जुगाड करून द्यायची भूमिका स्वीकारायची याचीही मानसिक तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. एनसीपी चं राष्ट्रीय नेतृत्व आणि राज्यातलं नेतृत्व यांच्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. राज्यातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्लीतल्या राजकारणात फारशी गती नाही. यामुळेच कार्यकर्त्यांचा गोंधळ उडतो. 
एनसीपी मधल्या प्रफुल पटेलांचा वावर ही अनेक राज्यातल्या नेत्यांना पटत नाही. मात्र दिल्लीच्या राजकारणात जागा बनवून ठेवण्यासाठी पटेल काम करत असतात. मोठ्या मॉल बाहेर आपल्या टपरीचं महत्व एखादा फेरीवाला ज्या पद्दतीनं बनवून ठेवतो ते काम पटेल करत असतात. पटेलांमुळे पक्षात प्रचंड नाराजी सुद्धा आहे, मात्र दिल्लीच्या राजकारणात एनसीपीची जी जागा आहे तीच एनसीपीमध्ये पटेलांची आहे. दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांचं महत्व आणि गरज सतत निर्माण करत राहण्याची कसरत पटेल करत असतात. 
या सर्व  फॉर्म्युला ला खुद्द पटेलांनीच आलू फॉर्म्युला असं नाव ठेवलंय. आलू चाट, आलू पुरी, जगात कुठल्याही अस्तित्वात असलेल्या भाजीत आलू म्हणजे बटाटा टाकल्यावर तो व्यवस्थित Adjust  होऊन जातो. त्याने चवी मध्ये काहीच फरक पडत नाही. उलट व्हॅल्यू addition  होतं. एनसीपी मुळे देशाच्या राजकारणाची चव बदलेल- वाढेल असं मुळीच नाही पण आलू मात्र Adjust होऊन जातो. 
बिहारच्या राजकारणात जनता परिवार ला पाठिंबा, दिल्लीच्या राजकारणात मोदींना विरोध करता करता मार्गदर्शन, महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना सरकार पडू न देण्याची पण पार पाडायची. अशी फार विचित्र रिसिपी एनसीपी सध्या शिजवतेय. नेमकं या रिसिपीने कुणाचं पोट भरणार आहे माहित नाही, मात्र आलू ला सध्या चिंता नाही. त्यासाठी बऱ्याच रिसिपी Adjust करून घ्यायला तयार आहेत. आता कार्यकर्त्यांनीही  पटेल न पटेल याची चिंता न करता ही रिसिपी शिकून समजून घेतली पाहिजे, किंवा या Adjustment च्या राजकारणातून बाहेर पडून कार्यकर्त्याचा धर्म पाळला पाहिजे. 



Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्