Skip to main content

Posts

Showing posts from February, 2011

दगड....

मागच्या आठवड्यात पत्रकार संघात गेलो. सहज नाही, ठरवूनच..एक पत्रकार परिषद अटेंड करायला. पत्रकार परिषद होती मेधा ताईंची. मी काही कव्हर करायला गेलो नव्हतो, ताईंना भेटायचं होतं, बरेच दिवस झाले भेटलो नव्हतो, हेतू होता मेंदूतले ब्लॉकेज काढून मेंदूला जरा  चालना मिळावी.. नर्मदे नंतर आता ताई मुंबईच्या झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नात गुतल्यायत. मला कससंच वाटलं.कससंच का वाटलं ते सविस्तर सांगेनच...      पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून ताई दुसरी कडे जाणार होत्या. ताईंच्या नेहमीच्या स्टाइलप्रमाणे त्यांनी जवळपास सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांना स्टेज वर बसवलं होतं. बाकीचे अगदी स्वत:ची नैतिक जबाबदारी असल्याप्रमाणे प्रेसनोट वाटप आणि चहा वाटपाचं काम करत होतं. आंदोलनाचं सूक्ष्म नियोजन काय असतं ते इथं समजत. प्रत्येकाकडे काही ना काही काम असतंच.ताई मध्येच जाणार म्हणून माझीही चूळबूळ सुरू होती बाहेर पडण्यासाठी. म्हणून आधीच बाहेर पडावं म्हणून मी उभा राहीलो, तोच ताईंनी मला अडवलं. रवी भाऊ आपण बसा ना.. हे लोक पत्रकार परिषद पुढे सुरू ठेवतील. यांचंही ऐका..मला घाई आहे निघायचंय..  मी लाजीरवाणं वाटून खाली बसलो. घाई मध

national park