Skip to main content

Posts

Showing posts from June, 2015

स्वच्छ महाराष्ट्र अभियान

समोसे में आलू

समोसे में आलू...  आटपाट नगराचा राजा कुणी बनायचं यावर चर्चा चाललेली असताना अचानक चर्चेतल्या नावांना बाजूला सारून आणि विरोधकांचं शिरकाण करून एखादा नवीनच राजा उद्याला येतो... सगळीकडे त्याचं गुणगान सुरू असतं. सर्वांत ताकदवर राजा कुणीही विरोधक शिल्लक नाही अशा वेळी हा राजा आपल्या मित्रांना पण भाव द्यायला तयार नसतो. अशा वेळी चिंध्या-चिध्या उडालेल्या विरोधकांतील एक सरदार राजाला न मागीतलेला पाठिंबा देतात. या सरदाराच्या सैन्यातल्या प्रमुख शिलेदारांवर अन्यायी- जुलुमी- भ्रष्टाचारी म्हणून आरोप झालेले असतात. तरी सुद्धा राजाला ममत्व भावना निर्माण होते आणि राजा या पराभूत सरदाराला आपला गुरू मानतो. गुरू सरदार मोठ्या मनाने झालेला पराभव, पडझड, नुकसान यासाठी राजाला माफ करत राजाला आपलं म्हणतो. आणि राजाचं राज्य सुरू होतं.  इथे पराभूत झालेल्या इतर सरदारांना खूप आश्चर्य वाटतं. ते गुरू सरदारा कडे येतात आणि विचारतात की तुम्ही आता राजा सोबत आहात का.. गुरू सरदार थोडंसं हसतात. पराभूत सैन्यातील इतर सरदारांच्या पाठिवर हात फिरवून सांगतात. राजाला मार्गदर्शनाची गरज असते अधेमधे. बाकी मी पराभूत झालेला असलो तरी स

लोकशाही विरोधी मोदी सरकार

आयआयटी मद्रास मध्ये मधल्या आंबेडकर – पेरियार स्टडी सर्कलच्या माध्यमातून विविध शैक्षणिक आणि वैचारिक कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली त्यावरून देशाचं सत्ताकारण चालवणाऱ्यांची मानसिकता काय आहे हेच दिसून आलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचं योगदान माहित नाही आणि अज्ञानातून अशी कारवाई झाली असं समजण्याचंही काही कारण दिसत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार माहित नाहीत अशी व्यक्तीही अभावानेच सापडेल. असं असताना या या स्टडी सर्कलवर झालेली कारवाई केवळ मोदी द्वेष पसरवला म्हणून झालीय असंही मानण्याचं कारण नाही. देशातील मागास समाजाला सन्मानाने जगण्याची वाट दाखवणाऱ्या नेत्यांच्या नावाने एखादं स्टडी सर्कल सुरू असेल आणि त्यावर कारवाई होत असेल तर त्या मागे राजकीय कारणांबरोबरच सामाजिक कारणेही स्पष्ट दिसतायत.  मद्रासमधल्या आंबेडकर- पेरियार स्टडी सर्कल मधल्या विद्यार्थ्यांनी 14 एप्रिल 2014 मध्ये स्वतंत्र विद्यार्थी ग्रुपची स्थापना केली. उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची विवेकानंद स्टडी सर्कल आधीपासूनच तिथे अस्तित्वात होतं. जून मध्ये आंबेडकर

वाघाचा ‘पोपट’ होतो तेव्हा....

मोदीं सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांच्या कामाचा भरपूर आढावा घेतला गेला. मोदींमुळे देशाचा काय फायदा झाला याची गणितं मांडली जात असताना ज्या शिवसेनेचं सर्वांत जास्त नुकसान झालं त्याची आठवण आणि चर्चा होणं ही तितकंच गरजेचं आहे. शिवसेना म्हणजे राज्यातील एक प्रमुख पक्ष. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेचं काय होणार या प्रश्नाला आपोआपच उत्तर मिळालं. बाळासाहेबांच्या निधनानंतर लगेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही शिवसेनेची ताकत कमी होतेय याची जाणीव झाली आणि त्यांनी शिवसेनेबरोबर काडीमोड घेतला. निवडणूकांच्या निकालांनी सर्वांना आपापली जागा दाखवून दिली. लोकसभा निवडणूकीच्या निकालांनी तर भाजपची शिवसेनेच्या मदतीची गरजच संपवून टाकली. विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळालं पण शेवटी जादुई आकडा गाठता आला नाही. या सगळ्या कालावधीत भारतीय जनता पक्षाने वारंवार शिवसेनेला अपमानीत करून त्यांची जागा दाखवून दिली. वारंवार जागा दाखवून पण शिवसेनेनं आपली पायरी ओळखूनही न ओळखल्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी, शिवसेनेच्या वाघाचा सर्वत्र पोपट झाल्याचंच पाहायला मिळालं. या

युतीचं नगर’विकासाचं’ कंत्राट धोक्यात..!

गेल्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांची पाहणी करायला निघालेल्या राजपुत्र आणि त्यानंतर विविध विकासकामांवर जातीनं लक्ष ठेऊन असलेल्या युवराजांच्या बातम्या सगळीकडे झळकल्या. खरं तर ठाकरे कुटुंबियांचं कौतुक आहे, ते आजही नालेसफाई, रस्ते दुरूस्ती, साथीचे आजार अशा वेळी घराबाहेर पडून स्वत : जातीने लक्ष घालून प्रशानसाकडून काम करवून घेतात. रिपोर्टर म्हणून मी स्वत : असे अनेक नाला आणि रस्ते दौऱ्यांचं वार्तांकन केलंय. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्तेदुरुस्ती हा विषय जरा जटील आहे. महापालिकेशी संबंधित असणाऱ्या अनेकांना त्यातली ‘ जटीलता ’ माहितीय. मुंबई महापालिकेचा पसारा मोठा आहे. मुंबई महापालिका काय काय काम करते याचा अंदाज महापालिका कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या संपामुळेही लक्षात येतो. महापालिकेचा व्याप जसा मोठा आहे, तसंच या महापालिकेचं बजेटही डोळे विस्फारून टाकणारं आहे. त्याचमुळे ठाकरे परिवाराचं मुंबई महापालिकेवर विशेष प्रेम आहे. ठाकरे परिवाराचं महापालिकेवर प्रेम असण्याचं कारण इथली निर्विवाद सत्ता आजपर्यंत सेना-भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. राज्यातल्या सत्तेपेक्षा मुंबईवरचा झेंडा शिवसेनेला अ

नरेंद्र मोदी....मोठा भीम आणि मोठा पप्पू

बदल हा कुठल्याही प्रगतीशील समाजाचा स्थायीभाव असतो. यंदांच्या निवडणुकीत भारतातील सुज्ञ समाजाने मतदानयंत्राच्या माध्यमातून बदल घडवली. होणारा बदल नेहमीच चांगला असतो असं मानायचं ही काही कारण नाही. जनतेने घडवलेला बदल चांगला आहे की वाईट हे कळायला अजून थोडा वेळ या सरकरला द्यायला हवा या मताचा मी आहे. दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनल्यानंतर अनेक लोकांनी माझ्याशी वाद धातला होता. मोदींच्या कडे पाहण्याचा तुमचा चष्मा तुम्ही बदलला पाहिजे असं अनेकांचं मत होतं. मला वाटत होतं, अजून मोदी पंतप्रधान बनायला प्रगल्भ झालेले नाहीत. माझं राहुल गांधींच्या बाबतीत ही हेच मत आहे. मोदींना अजूनही बराच टप्पा गाठायचाय असं माझं मत होतं. प्रगल्भता ही काही वयाने येत नाही, मोदींचा सर्व अनुभव हा राज्यातलं एक सरकार जबरदस्त मार्केटींगच्या साह्याने चालवण्याचा होता. मोदींचा गुजरात म्हणजे गुड गवर्नन्स आणि लोकशाहीचा आदर्श घ्यावा असं राज्य आहे असं कुणी तेव्हाही म्हणत नव्हत आणि आता तर काही जण उघडपणे मोदींचं गुजरात मॉडेल फसवं असल्याचं बोलू लागलेयत. मोदींचं मार्केटींग, टायमिंग आणि प्लानिंग जबरदस्त

दुुर्गीचं लग्न मोडा.....

“ सर, मी सात वर्षाची असताना लग्न झालं. आता मला समजतंय, मी कमवतेय. मला नकोय तो नवरा. मी नाही सांगीतलं, पण समाज ऐकत नाही. मला आता शिकायचंय, मोठं व्हायचंय. ”   दुर्गी शिर्के सांगत होती. दुर्गी संघर्ष करतेय स्वत : च्या ओळखीसाठी, नवीन आयुष्यासाठी. अशा अनेक दुर्गी आपल्या आसपास आहेत. आपण उगीचच सगळं काही ठीक चाललंय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलंच राज्य आलंय, लोकशाही आलीय, समस्या सुटू लागल्यायत या आनंदात जगतोय की काय असं वाटतं कधी कधी. दुर्गी शिर्के सध्या नोकरी करतेय. तिचा नवरा दारूडा आहे. तिला त्याच्या सोबत जायचं नाहीय, हे लग्नच मान्य नाहीय. पण ती सांगणार कुणाला, तिचं ऐकणार कोण, हा प्रश्न आहे. साहेब, आमची चूक झाली, पण आता आम्हाला त्या मुलाबरोबर पोरीला नांदवायची नाहीय. तो रोज दारू पिऊन दारावर येतो. गोंधळ घालतो. आम्हाला काय करावं सूचत नाहीय. दुर्गीची आई सांगत होती. दुर्गीची संपूर्ण कहाणी एका जिल्हाधिकारी असलेल्या मित्राला सांगून मदतीसाठी पुढची यंत्रणा जोडून दिली. पोलीसांकडून पण मदत मिळेल अशी व्यवस्था लाऊन दिली. हे सर्व होत असतानाच संध्याकाळी राष्ट्रसेवादलाची कार्यकर्ता असलेल्या

मोदी, गांधी आणि मार्केट.....

राहुल गांधी भारतात परत आले. नरेंद्र मोदी ही नुकतेच परदेश दौरा संपवून भारतात आले. दोघांच्याही परदेशवारीच्या मुद्द्यावरून प्रचंड वाद सुरू आहे. राहुल गांधींनी परत येताच काही शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि रामलीला मैदानावर एक प्रचंड मोठी महाकिसान रॅली काढली. महाकिसान रॅलीतून राहुल गांधी देशातील शेतकऱ्यांना संघर्षाचा काही मंत्र देतील असं वाटलं होतं पण शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेसने कसं चांगलं काम केलं हे सांगून त्यांनी शेतकऱ्यांच्या लढ्यात काँग्रेस नेहमीच पुढे असेल असं भाषण केलं. राहुल गांधी एवढ्या दिवसांनंतर आलेयत म्हटल्यावर ते देशभरातील मरगळलेल्या काँग्रेसजनांमध्ये नवीन जान फुंकतील आणि काँग्रेसला नवा कार्यक्रम देतील अशा आशेवर बसलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना जुनंच भाषण नवीन आवेगात ऐकून परतावं लागलं. नाही म्हणायला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भाषण जरूर केलं, पण अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होताना आणलेला हा आवेश सारखं सारखं बुंद से गई वो हौद से नहीं आती या म्हणीची आठवण करून देत होता. पहिल्या टप्प्यात गैरहजर राहणाऱ्या राहुल गांधींना आ

मुंबई महापालिका बरखास्त का करत नाही?

मनसेच्या संदिप देशपांडेंचा फोन आला , एक मोठा विषय आहे भेटायचंय म्हणून. मी संध्याकाळी ऑफिसला भेटायला बोलवलं. भेट झाली आणि संदिप देशपांडेंनी त्यांच्या कडची ऑडीयो क्लिप ऐकवली. मला फार काही धक्का बसला नाही. अनेकदा अशा प्रकारचे संवाद महापालिकेत ऐकले होते. विशेषत : मी जेव्हा महापालिका कव्हर करायचो तेव्हा तर जास्तच. अनेकदा तर बातम्याही केल्या पण त्याने फारसा फरक पडत नाही. महापालिकेत जी स्टँडींग कमिटी असते तिला तर अंडरस्टँडींग कमिटी म्हणूनच ओळखतात. गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महापालिका आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व नेत्यांना- पदाधिकाऱ्यांना ही सर्व गणितं आणि टक्केवारी अगदी तोंडपाठ आहे. काहींचं शिक्षणही झालेलं नाही पण ज्या पद्धतीने ते टक्केवारीचा हिशोब करतात ते पाहून अचंबितच व्हायला होतं. यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपचे नगरसेवकही काही मागे नाहीत. त्यांचे नेते तर नगरसेवकांच्याही एक पाऊल पुढे असतात काही वेळा. कोल्हापूरच्या महापौरांना लाच घेताना पकडलं त्यानंतरच खरं तर भ्रष्टाचाराचा हा मुद्दा चर्चेत आला होता. पण त्या वेळेला लाचेची रक्कम बघून खरं तर मला काय

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

डॉ आंबेडकर जयंती आणि गावगुंडांचं ब्रॅंडींग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनतेने जागोजागी उभारलेले पंडाल- लाऊड स्पीकर्स एव्हाना काढण्याचं काम सुरू असेल. साधारणत : एखादी व्यक्ती आपल्यात नसली की तिची उणीव ही आपल्याला काही दिवस- काही महिने जाणवते आणि मग आपण आपल्या कामाला सुरूवात करतो. पण जगाच्या इतिहासात अशीही एक व्यक्ती होऊन गेली की तिच्या नसण्यानंतरही वर्षानुवर्षे तिचे अनुयायी तिच्यावरचं प्रेम-कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या व्यक्तीचं नाव.  मध्यंतरीच्या काळात सोलापूरचे कलेक्टर तुकाराम मुंढे यांच्याशी बोलत होतो. काय काय नवीन योजना राबवतायत म्हणून चौकशा करत होतो. तेव्हा उल्लेखनीय बाब म्हणून त्यांनी ‘ वर्गणीदादांना ’ तंबी दिल्याची गोष्ट सांगीतली. मी एकदा सोलापूरमधून आंबेडकर जयंतीच्या दोन दिवस आधी प्रवास करत होतो. रात्री 12 वाजता एका रस्त्यावर माझी गाडी काही तरूणांनी अडवली होती. आंबेडकर जयंतीची वर्गणी दिल्याशिवाय गाडी सोडणार नाही म्हणत होते. 10-12 जण असतील. मी वर्गणी देणार नाही म्हटल्यावर त्यांचा  आवाज चढला