Skip to main content

Posts

Showing posts from March, 2011

अभिजात मराठी ला 8.9 हेक्टर भूकंपाचा धक्का

प्रथा म्हणून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री विरोधी पक्षांना  चहापानाला बोलावतात.. आणि प्रथा म्हणून विरोधी पक्ष चहापानावर बहिष्कार टाकतात.. प्रथा म्हणून आम्ही विरोधी पक्षनेत्यांच्या घरी दुपारचं जेवतो आणि मुख्यमंत्र्यांचा चहा प्यायला निघून जातो... सर्व काही प्रथेप्रमाणं... विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद हा तसा गंभीर विषय असतो... पण आता तो गंमतीचा व्हायला लागलाय.  गंमत काय आहे हे तुम्हाला कळावं म्हणून एक उदाहरण चिटकवूनच टाकतो.. जैतापूरच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला..जैतापूरबाबत काय भूमिका आहे...  * विरोधी पक्षनेत्यांचं उत्तर - सर्व गोष्टींचा खुलासा व्हायला पाहिजे.. लोकांसमोर सत्य आलं पाहिजे.. * शिवसेनेचं उत्तर - आमचा प्रोजेक्टलाच विरोध आहे.. * मनसे चं उत्तर - आमचा प्रकल्पाला विरोध नाही.. एका नावेत बसून तीन दिशांना नाव वल्हवणारे नावाडी असल्यावर आणखी काय पाहिजे...। बरं गंमत एवढ्यावरच संपत नाही ना.. शिवसेना आणि मनसे मध्ये टॉम एण्ड जेरी चा शो सुरू आहे.. बहुधा म्हणूनच सुभाष देसाईंना जर आपण ए टीम मानलं तर शिवसेनेनं आपली बी की सी टीम पाठवली होत