Skip to main content

अभिजात मराठी ला 8.9 हेक्टर भूकंपाचा धक्का

प्रथा म्हणून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री विरोधी पक्षांना  चहापानाला बोलावतात.. आणि प्रथा म्हणून विरोधी पक्ष चहापानावर बहिष्कार टाकतात.. प्रथा म्हणून आम्ही विरोधी पक्षनेत्यांच्या घरी दुपारचं जेवतो आणि मुख्यमंत्र्यांचा चहा प्यायला निघून जातो... सर्व काही प्रथेप्रमाणं...





विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद हा तसा गंभीर विषय असतो... पण आता तो गंमतीचा व्हायला लागलाय.  गंमत काय आहे हे तुम्हाला कळावं म्हणून एक उदाहरण चिटकवूनच टाकतो.. जैतापूरच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला..जैतापूरबाबत काय भूमिका आहे... 
* विरोधी पक्षनेत्यांचं उत्तर - सर्व गोष्टींचा खुलासा व्हायला पाहिजे.. लोकांसमोर सत्य आलं पाहिजे..
* शिवसेनेचं उत्तर - आमचा प्रोजेक्टलाच विरोध आहे..
* मनसे चं उत्तर - आमचा प्रकल्पाला विरोध नाही..

एका नावेत बसून तीन दिशांना नाव वल्हवणारे नावाडी असल्यावर आणखी काय पाहिजे...।

बरं गंमत एवढ्यावरच संपत नाही ना.. शिवसेना आणि मनसे मध्ये टॉम एण्ड जेरी चा शो सुरू आहे.. बहुधा म्हणूनच सुभाष देसाईंना जर आपण ए टीम मानलं तर शिवसेनेनं आपली बी की सी टीम पाठवली होती.. रवींद्र वायकर, दीपक सावंत, विनोद घोसाळकर आणि उपनेत्या निलम गोऱ्हे... यंदा खिंड लढवण्याची जबाबदारी रवींद्र वायकर या नव्या खेळाडूवर सोपवण्यात आली होती आणि निलम गोऱ्हे - दीपक सावंत यांना त्यांच्या शेजारी कुजबूज करायला बसवण्यात आलं होतं.

मनसेच्या टीम मधून बाळा नांदगावकर आणि सरदेसाई होते.. तमाम विरोधी पक्षातील एकवाक्यता एव्हाना विज्युअलाइज झालीच असेल सर्वांना.. म्हणूनच प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराच्या शेवटी एकनाथ खडसे ''जेवण तयार आहे.. चला अशी पुस्ती जोडत होते.. ''

जपान मध्ये आलेल्या भूकंपामुळे शिवसेनेला जैतारपूर विरोधात लढण्यासाठी बळ मिळालंय.. म्हणूनच रवींद्र वायकरांनी तडाखेबाज फलंदाजी करत सरकार वर आसूड ओढले.. स्टँडींग कमिटीचं अनेक वर्ष चेअरमन राहिलेल्या वायकरांचं ''अंडरस्टँडीग'' चांगलच वाढलेलं आहे.. स्टँडींग कमिटी मध्ये आजवर त्यांनी जे काम केलंय त्याचा प्रभाव आजही त्यांच्या वागण्या-बोलण्यावर आहे... अलिबाबाने भाड्याने आणलेल्या भांड्यांना लावलेल्या मेणाला माणकं जशी चिकटली होती तशीच काही परिमाणं वायकरांनां ही चिकटली त्याला ते काय करणार.. म्हणूनच जपानच्या भूकंपाची तीव्रता ''रिश्टर स्केल'' मध्ये मोजण्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. ''अभिजात मराठीच्या'' संवर्धनासाठी पुढे सरसावलेल्या वायकरांनी मराठी ला ''8.9 हेक्टर'' भूकंपाचा धक्का देत मातोश्रीने दाखवलेला विश्वास अगदी सार्थ करून दाखवला...

नीलम गोऱ्हेंची कुजबूज एव्हाना थांबली होती.. आणि विनोद तावडे ही भूकंप मोजण्याची नवीन पट्टी शोधण्यासाठी निघून गेले. वायकरांच्या अभ्यासावर विश्वास असलेले दिवाकर रावतें सह अनेक नेते दुसऱ्या दिवशी अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकरांच्या व्याख्यानात झोपलेले आढळले..

विरोधक झोपलेले पाहून मग मुख्यमंत्र्यांनी ही डुलक्या काढल्या.. पण साला काय करणार कॅमेरा सुरूच राहिला ना.. आता वळसे पाटिल पुन्हा कॅमेरावर बॅन आणणार.. म्हंजे.. पुन्हा मिडीयालाच 8.9 हेक्टरचा धक्का .....



Comments

Krishnadarshan said…
सॉलिड आहे सर ,पण एकदा तरी धक्का नाही मिडियाचा दणका दिलाच पाहिजे ! काय करायचं ते बोला ??
Unknown said…
kya baat mast lihalay sir, world cup cha fiver blog madhe distoy....Gr8 ..

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्