Skip to main content

Posts

Showing posts from April, 2011

MORAL GROUND

                              मोरल ग्राउंड                                 आझाद मैदानावर बऱ्याच दिवसांनी नॅशनल चॅनेलच्या ओबी व्हॅन आंदोलनाच्या बातम्या कव्हर करताना दिसल्या. आज मी पत्रकार म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून .. सकाळी मेधाताईंशी फोनवरून बोलणं झालं. तिकडे अण्णांच्या आंदोलनालाही ग्लॅमर आलंय.काहीतरी होईल असं वाटतंय आता.. जोर लावला पाहिजे. आझाद मैदानावर दोन भिन्न क्लासेसची गर्दी.. मेधा पाटकरांच्या तंबूत एसआरए पिडीत झोपडपट्टीवासीयांची गर्दी तर बाजूला अण्णांच्या समर्थनार्थ मोठा तंबू लागलेला. पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले बरेच अनोळखी चेहरे भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज बुलंद करत होते. तिकडे फेसबुक आणि ट्वीटरवर ही भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी होण्यासाठी मेसेज फिरत होते..पण आझाद मैदानात त्यांपैकी कोणी फिरकलं नाही. संध्याकाळी आमीर खाननं ही अण्णांच्या पाठिंब्यादाखल पत्रक काढलं..पंतप्रधानांना अण्णांच्या आंदोलनाची दखल घेण्याची विनंती केली.. सगळं जुळून येतंय असं वाटतंय. भ्रष्टाचार करणारी माणसंही भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलताना दिसतायत. भ्रष्टाचार केला नाही असा माणूस आहे का जगात.. प