Skip to main content

Posts

Showing posts from July, 2015

बात मुसलमान की नहीं.....

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे दु:खद निधन झालं आणि सर्व देश शोकाकुल झाला. सोशल मिडिया असो नाहीतर चावडीवरच्या गप्पा, कलाम यांच्या जाण्याने सर्वांचेच डोळे पाणावल्याचं दिसत होतं. हल्लीच्या काळात फार कमी लोकांच्या वाट्याला हे भाग्य येतं. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाची उंची नजिकच्या भविष्यात कुणी गाठू शकेल असं वाटत नाही. मनाला चटकन लावून जाणारी त्यांची एक्जीट. शेवटचा क्षण ही ते लोंकांसाठी जगले. डाॅ कलाम यांना श्रद्धांजली देणारे शेकडों मेसेजेस सोशल मिडियावर दिवसभर एकमेकांना पाठवले जात होते. त्यातलाच एक मेसेज धक्कादायक होता देख ले ओवैसी आज पुरा देश एक सच्चे मुसलमान के लिए रो रहा है बात मुसलमान की नहीं देश के साथ इमान की है! पाहायला गेला कर साधासा मेसेज, कुणीही सहज दुसऱ्याला फाॅरवर्ड करेल असा. एका सोशल मिडिया ग्रुप वर हा मेसेज आल्यानंतर माझ्या एका मुस्लीम मित्राने मला फोन केला. प्रचंड अस्वस्थ होता तो. मी त्याला अस्वस्थतेचे कारण विचारले. तो म्हणाला कलाम गेले याचं दु:ख करायला भारतीय असायला लागेल की, दु:ख जस्टीफाय करायला ते देशप्रेमी मुस्लीम होते हे सांगावं लागेल? अशा पोस्ट मागे ने

मोदी कधी कधी हिटलर आहेत...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलरशाही राबवतायत असं मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या स्नेहल आंबेकर यांनी म्हटलं. तसा स्नेहल आंबेकर यांचा राजकीय जीव लहानच. त्यांच्या वक्तव्याची फार कुणी दखल घ्यावी अशी स्थितीही नाही. शिवसेनेतही त्यांच्या मताला फार काही किंमत दिली जात असेल अशी ही स्थिती नाही. अचानक त्यांचं एक वक्तव्य ते ही देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीतलं माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनतो. मध्यंतरी राज पुरोहीत यांच्या स्टींग ऑपरेशन नंतर भाजपचा मुखवट्याआड असलेला चेहरा उघड झाला असं बोललं जात होतं, अचानक स्नेहल आंबेकर यांच्या वक्तव्यामुळे मोदींच्या कार्यपद्धतीवर चर्चा सुरू झाली, शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी तर कमळावरच बाण चालवले. सत्तेत असणाऱ्यांचा जीव सत्तेपासून एवढ्या लवकर उबगण्याची नक्की काय कारणं असावीत असा प्रश्न मला सातत्याने पडतो. विरोधी पक्षात असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक प्रचाराच्या दरम्यान उचललेल्या प्रश्नांची तातडीने उकल हवी होती. सत्ता आली त्यानंतर जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व प्रश्न सुटतील असं या आमदारांना- नेत्यांना वाटत होतं. राज

ऐसे कैसे जाले भोंदू

  कुंभमेळ्यासाठी कमी काळात जर या देशातील प्रशासन एखाद्या शहराचा चेहरा बदलण्याची ताकद ठेवत असेल तर मग ज्या शहरांचं, गावांचं आरोग्य बिघडलंय तेही दुरुस्त करण्याची ताकद इथल्या प्रशासनात आहे, हे नाकारून चालणार नाही.    सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झालीय, जवळपास तीन महिने हा दिव्य सोहळा नाशिकमध्ये चालणार आहे. गेल्याच आठवड्यात नाशिकमध्ये जाऊन आलो, प्रशासनाने केलेली भव्य दिव्य तयारी पाहिली. नाशिकच्या कुंभमेळ्यावर होत असलेला खर्च आणि आयोजन पाहिल्यानंतर या देशाला कधीच मंदी स्पर्श करू शकणार नाही असं वाटतं. प्रचंड पैसा खर्च करून नाशिकचे रस्ते चकाचक करण्यात आलेयत. साफसफाई करण्यात आलीय, झाडांची कटाई करण्यात आलीय. सर्व काही मस्त दिसत होतं.  कुंभमेळ्याच्या निमित्तानं लाखो लोक नाशिकमध्ये येणार, राहणार म्हणून विशेष तयारीसाठी गेले काही महिने प्रशासन दिवसरात्र काम करतंय. कुंभमेळ्यासाठी विशेष मंत्री पण नेमण्यात आलेला असल्याने समन्वयाची चिंताच नाही. बैठक घेऊन लगेचच निर्णय घेतले जातात आणि त्याची अमलबजावणीही लगेच होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही बरीच काळजी घेण्यात आलीय. दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून कडेक