Skip to main content

ओवैसी आणि बरंच काही....

 
owaisi brothers - messiha of Muslims??
" देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे, ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात, जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले, वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय, काय आहे त्यांच्या मनात, काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती.

वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओवैसी बंधू जर असंच काम करत राहिले तर देश कुठे जाईल असा प्रश्न अनेकांना पडतोय, आणि वारंवार चर्चेत आल्यामुळे मलाही कधी कधी असा प्रश्न पडतो की वारंवार मुस्लीम समाजाला भडकवून राजकीय पोळी भाजून घेणारे नेते आणखी किती काळ भारताच्या राजकारणात प्रभावी राहणार आहे.
ओवैसीं सोबत गप्पा मारताना अनेक प्रश्नांची उत्तरें मिळत गेली, काही प्रश्न नव्याने निर्माण झाले. पुन्हा जेव्हा त्यांना भेटेन तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं ही जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. पण त्याआधी एमआयएम ची नेमकी मांडणी काय आहे हे समजवून घ्यायला हवं. केवल वांद्रे निवडणूकीच्या पुढे जाऊन ओवैसींकडे पाहूया. ओवैसी बंधूंपैकी एक जण अती आक्रमक.. माथी भडकवणारी भाषणं करणारा. तर दुसरा म्हणजे मोठा भाऊ संयत पणे आपले मुद्दे मांडत बुद्धीभेद करणारा. आपला या देशावर, इथल्या न्यायलयांवर, इथल्या व्यवस्थेवर विश्वास आहे सांगत व्यवस्थेलाच आव्हान देणारा. या दोन्ही ओवैसींची भाषा आपल्याला खटकणारी.. थोडक्यात डोक्यात जाणारी. पण जरा शांतपणे विचार केल्यावर जाणवतं की हीच भाषा काही काळापूर्वी इथल्या दलित नेत्यांनी ही वापरली होती. ओवैसी मुसलमान असल्याने आणि त्यांची आक्रमकता पाहता आपण त्यांना वेगळ्या नजरेने बघतो. त्याचे वेगळे अर्थ लावतो.
या देशातला बहुसंख्य समाज हा असाच दलित पिडीत आणि पिचलेला असल्याची भावना बोलत आलाय. झालेल्या अन्यायाला तोंड फोडण्यासाठी संघर्षाची भाषा बोलत आलाय. रस्त्यावर उतरून आंदोलन करत आलाय. मग ओवैसी नेमकं वेगळं काय करतायत. काय वेगळं बोलतायत. ओवैसींच्या धर्मामुळे आपण त्यांना जरा वेगळ्या चष्म्यातून बघतो कायओवैसींचं म्हणणं आहे की देशाच्या राजकारणात मुस्लीम समाजाचं प्रतिननिधीत्व कमी होत चाललंय. प्रमुख राजकीय पक्ष नावालाच मुस्लीमांना तिकीटं देतात. त्यातील किती मुस्लीम निवडून येतात हा ही महत्वाचा प्रश्न आहे. सत्तेतला मुस्लीम समाजाचा वाटा दिवसें-दिवस कमी होत चाललाय. प्रातिनिधीक स्वरूपात मुस्लीम समाजातल्या काही लोकांना तिकीटं दिली की कोटा पूर्ण केल्याच्या बाता राजकीय पक्ष मारत फिरतात. पण यामुळे समाजाचा उद्धार होतोय का? सत्तेत मुस्लीम समाज खऱ्या अर्थाने सामील होतोय का? शिक्षणाच्या संधी खरोखरच या समाजापर्यंत जातायत का? जरा विचार केला तर जाणवतं की आपल्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांमधले हिंदू किंवा दलितही बऱ्याचदा ती वस्ती सोडून चांगल्या ठिकाणी राहायला जातात. पण मुस्लीम समाजातले लोक अजूनही तेच जीवन जगतायत.
स्वातंत्र्य मिळाल्याचे फायदे सर्वांना समान मिळायचे असतील तर पहिल्यांदा जे भारतात राहिले त्यांना भारतीय तर मानलं पाहिजे. अजूनही आपण मुस्लीमांना संशयानेच पाहतो. कुणाशीही दोस्ती कर पण मुस्लीमाशी नाही, असा धडा न मिळालेला एक तरी माणूस आहे का आपल्या अजाबाजूला. शाळेत आपल्या सोबत शिकणाऱ्या मुस्लीम मित्राने कुठे एके 47 चालवलेली असते, तरी सुद्धा आपण लहानपणापासून हेआणि तेपाळतच आलोय ना. मी आणखी एक गोष्ट जवळून पाहिलीय, एरवी सवर्ण समाजाला शिव्या देणारे अनेक कथित दलित ही अशा वेळी हेआणि तेची भाषा बोलताना दिसतात.
मुख्य प्रवाहात येण्यासाठी जर जागोजागी असे बांध घातलेले असतील तर मग मुख्य प्रवाहाने एवढी खळखळ का करावी? जर मुख्य प्रवाहातल्या या गोष्टी कुणी दाखवून देण्याचा प्रयत्न केला तर मग त्याला थेट देशद्रोही का ठरवावं? अनेकदा या मुद्द्यावर विचार करताना डोकं भंजाळून जातं. मग जर खोलात विचार केला जर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक तर अशी भाषा वापरणारे केवळ हे एकच ओवैसी नाहीयत. असे अनेक ओवैसी आपल्या आजूबाजूला सतत असतात. कधी त्यांचं नाव ठाकरे असतं तर कधी मोदी.. पण हे ओवैसी आपल्याला खटकत नाहीत. देवांवर पचापचा थुंकणारे ही काही ओवैसी असतात. ते कधी कधी आपल्याला खटकतात. काही ओवैसी साध्वी असतात तर काही शंकराचार्य. काही ओवैसी महंत असतात तर काही स्वामी.. हे ही ओवैसी आपल्याला फारसे खटकत नाहीत.
ओवैसी मुस्लीम आहेत म्हणून आपण त्यांना सहानुभूतीनं पाहिलं पाहिजे असं ही माझं म्हणणं नाही. या देशाच्या राज्यघटनेवर न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असं सांगून यंत्रणेला खिंडार पाडणाऱ्या कुठल्याच शक्तींचं समर्थन होऊ शकत नाही. माय नेम इज खान सांगीतल्यावर टेरिरीस्टच असं जोपर्यंत आपल्या डोक्यात येत राहील तो पर्यंत ओवैसींच्या जन्माचा सिलसिला जारीच राहणार आहे. जरा आपल्याला ही दृष्टी आणि दृष्टीकोन बदलावा लागणार आहे.
हा दृष्टीकोन बदलला नाही तर येत्या काळात आणखी ही धोके निर्माण होण्याची शक्यता समोर दिसतेय. सध्या केवळ मुस्लीम समाजातच ओवैसी दिसतायत. कारण काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांनी काही मूठभर लोकांना हाताशी धरून जातीयतेचं राजकारण केलं. आता मुस्लीम समाजाला स्वत:ची ओळख हवीय, म्हणून तो कधी समाजवादी पक्षाच्या मागे गेला तर कधी जनता दलाच्या. जो जो सत्तेत येऊ शकतो त्याच्या मागे हा समाज फरफटत गेलाय. त्याला जेव्हा स्वत:ची वेगळी ताकत निर्माण करायची असेल तेव्हा तो अशाच पद्धतीने तोंडाळ नेत्यांच्या मागे धावणार यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. या पुढे मुस्लीम समाजा सारखंच वापरल्या गेलेल्या दलित समाजाला मध्ये सुद्धा मुख्य प्रवाहातील पक्षांच्या वरची नाराजी दाखवण्यासाठी पर्यायांची आवश्यकता आहे. सध्या तिथेही दलाल नेत्यांचा सुळसुळाट आहे. अशात दलित चळवळींमधूनही अशाच प्रकारचा एखादा ओवैसी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असे ओवैसी नको असतील तर समाजातील दलित- मागास समाजांना त्यांचा वाटा वेळोवेळी नीट दिला पाहिजे, त्यांच्या वाट्याचा काटा मारला तर त्याची किंमत चुकवण्याची तयारीही ठेवली पाहिजे.

https://www.youtube.com/watch?v=7l89a4F9yb8

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्