Skip to main content

दगड....

मागच्या आठवड्यात पत्रकार संघात गेलो. सहज नाही, ठरवूनच..एक पत्रकार परिषद अटेंड करायला. पत्रकार परिषद होती मेधा ताईंची. मी काही कव्हर करायला गेलो नव्हतो, ताईंना भेटायचं होतं, बरेच दिवस झाले भेटलो नव्हतो, हेतू होता मेंदूतले ब्लॉकेज काढून मेंदूला जरा  चालना मिळावी.. नर्मदे नंतर आता ताई मुंबईच्या झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नात गुतल्यायत. मला कससंच वाटलं.कससंच का वाटलं ते सविस्तर सांगेनच... 
    पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून ताई दुसरी कडे जाणार होत्या. ताईंच्या नेहमीच्या स्टाइलप्रमाणे त्यांनी जवळपास सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांना स्टेज वर बसवलं होतं. बाकीचे अगदी स्वत:ची नैतिक जबाबदारी असल्याप्रमाणे प्रेसनोट वाटप आणि चहा वाटपाचं काम करत होतं. आंदोलनाचं सूक्ष्म नियोजन काय असतं ते इथं समजत. प्रत्येकाकडे काही ना काही काम असतंच.ताई मध्येच जाणार म्हणून माझीही चूळबूळ सुरू होती बाहेर पडण्यासाठी. म्हणून आधीच बाहेर पडावं म्हणून मी उभा राहीलो, तोच ताईंनी मला अडवलं.
रवी भाऊ आपण बसा ना.. हे लोक पत्रकार परिषद पुढे सुरू ठेवतील. यांचंही ऐका..मला घाई आहे निघायचंय.. 
मी लाजीरवाणं वाटून खाली बसलो. घाई मध्येही ताईंनी पत्रकारांच्या प्रश्नांना सविस्तर वीस मिनिटे उत्तरं दिली, आणि त्या निघाल्या..मी ही बाहेर पडलो.. बाहेर आल्यानंतर काही बोलावं, पुढच्या आंदोलनाचं नियोजन कसं काय हे जाणून घ्यावं असं मनात होतं, पण बाहेर येताच सीन काही वेगळाच होता. बाहेर 40-50 बायका आधीच ताईंची वाट पाहत उभ्या होत्या. बिल्डरने त्यांच्या झोपडपट्टीचं पाणी तोडलं होतं.  एसआरए योजनेला विरोध केल्यामुळे बिल्डरने वस्तीचं पाणीचं तोडलं. मी राह्यलोय झोपडपट्टीमध्ये.. पाणी भरायला बाहेर सार्वजनिक नळ किंवा बोअरवेल.. पाणी नाही आलं तर काय होतं हे इमारतींमध्ये राहणाऱ्या माणसालाही समजतं. मग पाणी तोडण्याची दादागिरी या मुंबई मध्ये एखादा बिल्डर कसा काय करू शकतो हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. बिल्डर ही काय पाणी पुरवणं किंवा तोडणं याचा निर्णय घेणारी ऑथॉरिटी आहे काय..असे अनेक प्रश्न डोक्यात भुंगा होऊन फिरायला लागले. बरं हे काही मी पहिल्यांदा ऐकत किंवा बघत नव्हतो..।
तरी सुद्धा प्रत्येक वेळेला एसआरए योजनेमध्ये झोपडपट्टीवासीयांना ज्याप्रमाणे वागवलं जातं ते ऐकून डोकं बधीर होऊन जातं. बरं आपण काय करणार यात. एसआरए योजनांच्या एवढ्या बातम्या केल्या की आता एकेक योजनेची वेगळी बातमीही करता येत नाही. आणि बातम्यांचा काय फायदा होणार.. ज्यांच्या कडे फिर्याद करायची तो एसआरए मध्ये कुठे ना कुठे कुठल्यानं कुठल्या बिल्डराचा पार्टनर निघतो.
सर्वच विकायला निघालेलं आहे. मेधा ताई मात्र यावर ही उपाय आहे असं सर्वांना सांगत लढण्यासाठी एक व्हा म्हणून समजावत होती. मध्येच कोणीतरी नवीन चर्चा सुरू केली होती, ताईंचं आंदोलन म्हणजे बिल्डर लॉबी च्या संघर्षातून सुरू झालेलं आंदोलन आहे..फंड बिल्डरच पुरवतायत..काय फायदा आहे फंडचा.. ताई कुठे गळ्यामध्ये '' पच्चास तोला'' सोनं मिरवते, कुठे बीएमडब्ल्यू मध्ये फिरते, जर हे काहीच करत नाही मग फंड चा काय फायदा.. लढण्यासाठी फंड नाही लोक लागतात. 25 वर्षे लोक पगार घेउन आंदोलन नाही करू शकत.. पगारी माणसं नोकरी करू शकतात, ती सुद्धा पुर्ण इमानदारीनं करतीलच अशी शाश्वती नाही. असो..
मी म्हणतं होतो की ताईंनी सुरू केलेलं हे नवं आंदोलन पाहून कससंच वाटलं. थोडंसं अवघडलो..अवघं आयुष्य गेलं ताईचं नर्मदेच्या खोऱ्यात... आदिवासींचा लढा लढण्यात.. आदिवासी जे सत्तेच्या गल्लीपासून खूप दूर असतात. त्यांना चेहरा नसतो.. आवाज नसतो... इथेही तीच परिस्थिती आहे.. बिनचेहऱ्याचा झोपडपट्टी वासी.. त्याची झोपडी अधिकृत करायची, मग तिथे त्याचं पुनर्वसन करायची योजना आणायची, त्याचे श्रम घ्यायचे आणि मग त्याची जागा लुटायची. अनधिकृत पणे राहणाऱ्या लोकांचं एक वेळ ठिक आहे, पण ज्यांना आपण अधिकृत केलंय त्यांची जमीन बळाचा वापर करून लुटायची ते ही सत्तेच्या गल्लीजवळ... सत्तेत बसलेल्या लोकांनीच..?

कससंच आणि अवघडल्यासारखं अशासाठी वाटलं की सत्तेत बसलेल्या दादांनी दादागिरी करत राहावी आणि ताई-अण्णांनी लढत रहावं.. ऊर फाटे पर्यंत...आणि आपण कव्हर कराव्यात दोघांच्याही पत्रकार परिषदा.. दगड बनून..........

Comments

zopadya phkt marathi mansanach dilya pahijet. zopdyachya jagi paki ghare sudha phkt marathi mansanach dili pahijet

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्