Skip to main content

who killed Narendra Dabholkar

नरेंद्र दाभोलकरांची हत्या कोणी केली, हा प्रश्न ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. सध्या सरकारही ह्या प्रश्नाचं उत्तर शोधतंय. विवेकवादी चळवळही पुन्हा एकदा आत डोकावून शोधायला लागलीय... एकमेकांना हाक देऊन जागवायला लागलीय.... असं काही घडलं की सारे एकत्र येतात.. पुन्हा लढायच्या आणा-भाका घेतात..बस्स...

दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले.. कोणी मारलं असेल.. दाभोलकरांना जे लोक जवळून ओळखायचे त्यांचा तर ह्या घटनेवर-दुर्घटनेवर विश्वासच बसला नाही..एक माणूस जो सतत कुठेही डोक्याचा पारा न चढवता अंधश्रद्धा विरोधी काम करतो.. अनिष्ट प्रथांना आव्हान देतो.. लोकांच्या मनातले गैरसमज दूर करतो.. कुठेही आक्रस्ताळे पणा नाही.. आरडा ओरडा नाही.. अशा माणसाला कोण आणि कशाला मारू शकेल...पण त्यांना डोक्यात गोळी मारून दोघा बाईकस्वारांनी मारलं... कदाचित मारेकरी दाभोलकरांचा सामना करायला घाबरले असावेत म्हणून त्यांनी मागून गोळी मारली..

दाभोलकरांच्या हत्येनंतर खडबडून जागं होत सरकारनं जादूटोणा विरोधी अध्यादेश काढला.. अब्रू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न.. पण त्यानंतर दाभोलकरांची वेगवेगळ्य़ा स्तरावर हत्या करण्याचा प्रयत्न झाला, मला वाटतं त्यावर भूमिका घेण्याची वेळ आहे.

दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर मिडियातील अनेक मित्रांना एसएमएस आले.. दाभोलकर ब्राम्हण होते म्हणून मिडियातील बामणी लोक त्यांचं गुणगान करतायत.. खरं तर ह्या कायद्याचं.. ह्या लढ्याचं श्रेय श्याम मानव यांचं आहे..
खरं तर महाराष्ट्रातील कुणीच अंधश्रद्धेच्या ह्या लढ्यातील श्याम मानव आणि नरेंद्र दाभोलकरांच्या योगदानाबाबत कधीच शंका घेतली नाही. ह्या चळवळीचं श्रेय दोघांचंच.. त्यात तिसरा वाटेकरी नाहीच.. पण दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर त्यांची जात का बरी शोधली गेली... कोण आहेत ही लोक...काय साध्य करायचं होतं ह्यातून..

दाभोलकरांच्या हत्येनंतर श्याम मानव वेगवेगळ्या ठिकाणी नरेंद्र दाभोलकरांवर बोलले.. मुंबईतही आले. इथे त्यांनी पत्रकारांच्या मोठ्या समूहासमोर भाषण केलं.. आरएसएस ला एका अर्थाने क्लीन चीट दिली. त्यानंतर ज्या शिवसेनेने ह्या बिलाला विरोध केला होता, बिल अडवून ठेवलं होतं त्या शिवसेनेचा बिलाला विरोधच नव्हता.. उलट पेपर मध्ये आलेल्या बातम्यांमुळेच लोकांमध्ये गैरसमज झाले असा जावईशोध लावला..नंतर तर हे बिल विलासरावांच्या काळातच आलं असतं पण ऐनवेळी विलासराव देशमुखांच्या लातूर मध्ये दाभोलकरांनी उपोषण केल्यामुळे विलासराव व्यथित झाले आणि म्हणून सर्व फ्लोअर मॅनेजमेंट झालेलं असूनही विधेयक पास होऊ शकलं नाही असा प्रचार केला जात आहे...

मी काही श्याम मानव यांना आव्हान देण्याइतका मोठा नाही.. पण दाभोलकरांच्या मृत्यूनंतर आता श्याम मानव हे एकमेव नेते ह्या चळवळीला राह्यलेत. अशा वेळी श्याम मानवांसारख्या मोठ्या माणसाकडून फार अपेक्षा आहेत. संमोहनाच्या क्षेत्रात श्याम मानवांचं मोठं काम आहे, पण प्रत्येक गोष्ट संमोहन थिअरी वर आणणंही योग्य नाही.

मला वाटतं दाभोलकरांच्या हत्येनंतर ही त्यांची हत्या होतेय.. ती रोखली पाहिजे..

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्