Skip to main content

39 एके 39....39 दुणे...

मध्यंतरी नागपूर ला गेलो होतो हिंवाळी अधिवेशनाच्या कव्हरेज साठी.. अधिवेशनाचं रटाळ आणि एकसुरी कामकाज संपवल्यानंतर शनिवार - रविवार काय करायचं असा प्रश्न नेहमीच पडतो.. खाणावळी शोधून तरी किती शोधणार.. नागपूरातले जवळपास सगळी हॉटेल्स आतापर्यंत
जीभेखालून
गेलीयत, त्यामुळे शनिवार - रविवार नागपूराच्या बाहेर जायचा प्लान करत होतो..

मंत्री नितिन राऊतांशी बोलताना समजलं की वाशिम मध्ये काही युवकांनी एक चांगला प्रोजेक्ट केलाय, पाहण्यासारखा आहे. पूर्णत: कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेलं पण आता पंतप्रधानांचं पॅकेजच काय पण कुठलीही सरकारी कर्ज घेणार नाहीत म्हणणारं विदर्भातलं पहिलं गाव माझ्या निदर्शनास आलं.. इंटरेस्टींग वाटलं, म्हटलं जाऊन येऊयात, पण आता अशी पॉझीटीव्ह स्टोरी लागेल की नाही याची शाश्वती नव्हती. शेवटी दिल्ली शी बोललो.. एरव्ही मला आतापर्यंत मला नोकरी देणाऱ्या कुठल्याही चॅनेलने फिरू नको असं कधीच सांगीतलं नाही, आताही तसाच अनुभव आला... दिल्ली हून ओके मिळाल्यानंतर शनिवारी जायचं ठरलं.

नकाशा किंवा जीपीएस च्या माध्यमातून रस्ते शोधत जाण्याचा माझा जुनाच छंद आहे. रस्त्यावर चालणाऱ्या माणसांना थांबवून पत्ता विचारणे हा आणखी एक छंद.. यामुळे भाषा जाणून घेता येते.. विदर्भात मराठीत प्रश्न विचारला तरी बऱ्याचदा उत्तर हिंदीत येते... प्रवासात फार वेळ गेला..पण तिथेच रेंगाळत न बसता सरळ गिराडात पोहोचतो..उगीच प्रवास वर्णन कशाला ना.. जे जग दुनियेने पाहिलं ते आपण पाहिल्यावर आपल्याला कसं वाटलं हे कोलंबसाच्या थाटात सांगायला मला जरा कठीणचं जातं.

बरं मी तुम्हा सगळ्यांना गिराडात का आणलंय.. बातमी काय केली ते दाखवून झालंय, पण बातमी पलिकडची आणखी काही आहे सांगण्यासारंख ते सांगाव म्हणून..

गिराडाच स्टोरी - बीरी झाली.. आता ग्रामीण भागात मुंबईतून गेलेल्या पत्रकाराला कसं वागवलं जातं हे काही सांगायलाच नको..एवढी उठबस की लाजायलाच होतं... स्टोरी संपल्यावर गावकऱ्यांनी आग्रह केला..आता जेऊन जायचं.. बरं नाही बोलायची सोय नाही. येताना फुटकळ काही तरी खाल्लं होतं.. भूक लागलीच होती.. रात्रीचे 8 वाजले होते, पण लोडशेडींग मुळे 10 वाजल्याचा एहसास..

नाही नाही म्हणता, थांबलो.. मटणाचा बेत म्हटल्यावर नाही कशाला म्हणायचं.. सरपंचाच्या घरी बसलो. तिथे बसल्यावर सरपंचाचं फारतर 5 वर्षाचं बुटकसं पोरगं समोर येऊन उभं राहीलं. आतमधून त्याची आई जोर्रानं ओरडली.. बोल की रं..

हा प्रसंग तसा नेहमीचाच असतो..कुठे गेलं की घरातली मोठी माणसं लहानग्याना कला सादर करायला भाग पाडतात. आणि आपलं पोर कसं बाळकृष्ण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात.

वाटलं त्यातलंच असेल.. बरं अन्नदाता आहेत, सर्व गोड मानून घ्यावं लागतं..

पोरगं तसं हट्टंकट्टं च होतं. अंगापेक्षा शर्ट आणि पँट मोठी त्यामुळे थोडासा
गुंड्या
टाइप दिसत होता. शाळेत लहाणपणी इन्स्पेक्क्षण ला येणाऱ्यां दोन-तीन लोकांसमोर आपण जसं हाताची घडी घालून उभं राह्यचो तसा तो उभा होता..पण जरा धीट..

समोर उभा राह्यला एखदम कडक..

आणि सुरू झाला ..

1 एके 1, एक दुणे 2.... तीन एके तीन... नऊ एके नऊ... पठ्ठ्या थांबेना.. म्हटलं.. बस्स बस्स्.. आणखी कुठचा पाढा येतो.. 39 चा येतो का....

सवाल संपायच्या आत पाढा सुरू.. 39 एके 39 ..39 दुणे.........

अख्ख्या आयुष्यात मी 12 च्या पुढे कधी गेलो नाही...

डोळे आले म्हणून गेले तीन दिवस घरी होतो.. दुसरीत जाते मल्लिका आता.. तिला म्हटलं टेबल्स येतात का..बोलून दाखव.. कधी तीन, कधी पाच तर कधी सहा च्या
टेबल्स
वर अडकत राहीली..

घरचे सर्व ओरडतं होते, दिवसभर खेळायला पाहिजे, टीव्ही बघायला पाहिजे..

माझ्या डोळ्यासमोर सरपंचाचा तो
गुंड्या
उभा राह्यला...

आयला, ह्या लाईटीनं नुकसान केलं पोरांचं.. लोडशेडींगच बरं...

Comments

Nice! This is actuly & sensitive story...मला नेहमी वाटतं, टीव्ही रिपोर्टरकडं पडद्यावर दाखवतात, त्यापेक्षा वेगळ्या, पडद्यामागच्या खूप स्टोरीज् असतात...त्याचाच हा एक प्रत्यय..! या संवेदना जपायला हव्यात...

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. पहिल्