Skip to main content

Posts

Showing posts with the label BJP

Open letter to Sharad Pawar

मा. शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. पत्र लिहिण्यास कारण की तुमच्या सध्याच्या राजकारणावरून मला काही प्रश्न पडलेयत. नेहमीप्रमाणे साहेबांना सर्व माहित असतं असं तुमच्या भक्तांकडून कळलं आणि विचार केला की थेट तुम्हालाच हे प्रश्न विचारावेत. तुम्ही सतत बेरजेचे राजकारण करत आलात, त्यामुळे तुमच्या राजकारणाचा आवाका कुणालाच लक्षात आला नाही. बेरीज करता करता तुम्ही इतके पुढे गेलात की नेमकं तुम्ही काय काय जोडलंय हे ही तुमच्या लक्षात राहिले नसावं. अर्थात यालाही तुमचे भक्त आक्षेप घेतील. साहेबांना सर्व माहित असतं, आणि त्यांच्या लक्षात सर्व असतं अशी त्यांची पक्की धारणा आहे. असो, तो काही आपला विषय नाही. गेली अनेक वर्षे तुम्ही राज्यातील पुरोगामी राजकारणाचा चेहरा आहात. संघ परिवारावर थेट, आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुरोगामी चळवळीतले लाखों कार्यकर्ते, कुठेच काही नाही झालं तर आहेत पवार साहेब, म्हणत थेट तुमच्या दारात यायचे. तुम्ही ही मोठ्या मनाने त्यांना सामील करून घेतलं. तुमचा पक्ष वाढत गेला. मग हळूहळू हा पक्ष नसून टोळी आहे असा आरोप विरोधी पक्षांनी सुरू केला. तुमच्यावरचा हल्ला म्हणजे पुर...

मोदी कधी कधी हिटलर आहेत...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलरशाही राबवतायत असं मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या स्नेहल आंबेकर यांनी म्हटलं. तसा स्नेहल आंबेकर यांचा राजकीय जीव लहानच. त्यांच्या वक्तव्याची फार कुणी दखल घ्यावी अशी स्थितीही नाही. शिवसेनेतही त्यांच्या मताला फार काही किंमत दिली जात असेल अशी ही स्थिती नाही. अचानक त्यांचं एक वक्तव्य ते ही देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीतलं माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनतो. मध्यंतरी राज पुरोहीत यांच्या स्टींग ऑपरेशन नंतर भाजपचा मुखवट्याआड असलेला चेहरा उघड झाला असं बोललं जात होतं, अचानक स्नेहल आंबेकर यांच्या वक्तव्यामुळे मोदींच्या कार्यपद्धतीवर चर्चा सुरू झाली, शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी तर कमळावरच बाण चालवले. सत्तेत असणाऱ्यांचा जीव सत्तेपासून एवढ्या लवकर उबगण्याची नक्की काय कारणं असावीत असा प्रश्न मला सातत्याने पडतो. विरोधी पक्षात असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक प्रचाराच्या दरम्यान उचललेल्या प्रश्नांची तातडीने उकल हवी होती. सत्ता आली त्यानंतर जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व प्रश्न सुटतील असं या आमदारांना- नेत्यांना वाटत होतं. राज...

ऐसे कैसे जाले भोंदू

  कुंभमेळ्यासाठी कमी काळात जर या देशातील प्रशासन एखाद्या शहराचा चेहरा बदलण्याची ताकद ठेवत असेल तर मग ज्या शहरांचं, गावांचं आरोग्य बिघडलंय तेही दुरुस्त करण्याची ताकद इथल्या प्रशासनात आहे, हे नाकारून चालणार नाही.    सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झालीय, जवळपास तीन महिने हा दिव्य सोहळा नाशिकमध्ये चालणार आहे. गेल्याच आठवड्यात नाशिकमध्ये जाऊन आलो, प्रशासनाने केलेली भव्य दिव्य तयारी पाहिली. नाशिकच्या कुंभमेळ्यावर होत असलेला खर्च आणि आयोजन पाहिल्यानंतर या देशाला कधीच मंदी स्पर्श करू शकणार नाही असं वाटतं. प्रचंड पैसा खर्च करून नाशिकचे रस्ते चकाचक करण्यात आलेयत. साफसफाई करण्यात आलीय, झाडांची कटाई करण्यात आलीय. सर्व काही मस्त दिसत होतं.  कुंभमेळ्याच्या निमित्तानं लाखो लोक नाशिकमध्ये येणार, राहणार म्हणून विशेष तयारीसाठी गेले काही महिने प्रशासन दिवसरात्र काम करतंय. कुंभमेळ्यासाठी विशेष मंत्री पण नेमण्यात आलेला असल्याने समन्वयाची चिंताच नाही. बैठक घेऊन लगेचच निर्णय घेतले जातात आणि त्याची अमलबजावणीही लगेच होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही बरीच काळजी घेण्यात आलीय. दहशतवादी हल्ला ...

समोसे में आलू

समोसे में आलू...  आटपाट नगराचा राजा कुणी बनायचं यावर चर्चा चाललेली असताना अचानक चर्चेतल्या नावांना बाजूला सारून आणि विरोधकांचं शिरकाण करून एखादा नवीनच राजा उद्याला येतो... सगळीकडे त्याचं गुणगान सुरू असतं. सर्वांत ताकदवर राजा कुणीही विरोधक शिल्लक नाही अशा वेळी हा राजा आपल्या मित्रांना पण भाव द्यायला तयार नसतो. अशा वेळी चिंध्या-चिध्या उडालेल्या विरोधकांतील एक सरदार राजाला न मागीतलेला पाठिंबा देतात. या सरदाराच्या सैन्यातल्या प्रमुख शिलेदारांवर अन्यायी- जुलुमी- भ्रष्टाचारी म्हणून आरोप झालेले असतात. तरी सुद्धा राजाला ममत्व भावना निर्माण होते आणि राजा या पराभूत सरदाराला आपला गुरू मानतो. गुरू सरदार मोठ्या मनाने झालेला पराभव, पडझड, नुकसान यासाठी राजाला माफ करत राजाला आपलं म्हणतो. आणि राजाचं राज्य सुरू होतं.  इथे पराभूत झालेल्या इतर सरदारांना खूप आश्चर्य वाटतं. ते गुरू सरदारा कडे येतात आणि विचारतात की तुम्ही आता राजा सोबत आहात का.. गुरू सरदार थोडंसं हसतात. पराभूत सैन्यातील इतर सरदारांच्या पाठिवर हात फिरवून सांगतात. राजाला मार्गदर्शनाची गरज असते अधेमधे. बाकी मी पराभूत झालेला अ...

लोकशाही विरोधी मोदी सरकार

आयआयटी मद्रास मध्ये मधल्या आंबेडकर – पेरियार स्टडी सर्कलच्या माध्यमातून विविध शैक्षणिक आणि वैचारिक कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली त्यावरून देशाचं सत्ताकारण चालवणाऱ्यांची मानसिकता काय आहे हेच दिसून आलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचं योगदान माहित नाही आणि अज्ञानातून अशी कारवाई झाली असं समजण्याचंही काही कारण दिसत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार माहित नाहीत अशी व्यक्तीही अभावानेच सापडेल. असं असताना या या स्टडी सर्कलवर झालेली कारवाई केवळ मोदी द्वेष पसरवला म्हणून झालीय असंही मानण्याचं कारण नाही. देशातील मागास समाजाला सन्मानाने जगण्याची वाट दाखवणाऱ्या नेत्यांच्या नावाने एखादं स्टडी सर्कल सुरू असेल आणि त्यावर कारवाई होत असेल तर त्या मागे राजकीय कारणांबरोबरच सामाजिक कारणेही स्पष्ट दिसतायत.  मद्रासमधल्या आंबेडकर- पेरियार स्टडी सर्कल मधल्या विद्यार्थ्यांनी 14 एप्रिल 2014 मध्ये स्वतंत्र विद्यार्थी ग्रुपची स्थापना केली. उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची विवेकानंद स्टडी सर्कल आधीपासूनच तिथे अस्तित्वात होतं. जून मध्ये आंब...

युतीचं नगर’विकासाचं’ कंत्राट धोक्यात..!

गेल्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांची पाहणी करायला निघालेल्या राजपुत्र आणि त्यानंतर विविध विकासकामांवर जातीनं लक्ष ठेऊन असलेल्या युवराजांच्या बातम्या सगळीकडे झळकल्या. खरं तर ठाकरे कुटुंबियांचं कौतुक आहे, ते आजही नालेसफाई, रस्ते दुरूस्ती, साथीचे आजार अशा वेळी घराबाहेर पडून स्वत : जातीने लक्ष घालून प्रशानसाकडून काम करवून घेतात. रिपोर्टर म्हणून मी स्वत : असे अनेक नाला आणि रस्ते दौऱ्यांचं वार्तांकन केलंय. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्तेदुरुस्ती हा विषय जरा जटील आहे. महापालिकेशी संबंधित असणाऱ्या अनेकांना त्यातली ‘ जटीलता ’ माहितीय. मुंबई महापालिकेचा पसारा मोठा आहे. मुंबई महापालिका काय काय काम करते याचा अंदाज महापालिका कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या संपामुळेही लक्षात येतो. महापालिकेचा व्याप जसा मोठा आहे, तसंच या महापालिकेचं बजेटही डोळे विस्फारून टाकणारं आहे. त्याचमुळे ठाकरे परिवाराचं मुंबई महापालिकेवर विशेष प्रेम आहे. ठाकरे परिवाराचं महापालिकेवर प्रेम असण्याचं कारण इथली निर्विवाद सत्ता आजपर्यंत सेना-भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. राज्यातल्या सत्तेपेक्षा मुंबईवरचा झेंडा शिवसेनेला अ...

मोदी, गांधी आणि मार्केट.....

राहुल गांधी भारतात परत आले. नरेंद्र मोदी ही नुकतेच परदेश दौरा संपवून भारतात आले. दोघांच्याही परदेशवारीच्या मुद्द्यावरून प्रचंड वाद सुरू आहे. राहुल गांधींनी परत येताच काही शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि रामलीला मैदानावर एक प्रचंड मोठी महाकिसान रॅली काढली. महाकिसान रॅलीतून राहुल गांधी देशातील शेतकऱ्यांना संघर्षाचा काही मंत्र देतील असं वाटलं होतं पण शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेसने कसं चांगलं काम केलं हे सांगून त्यांनी शेतकऱ्यांच्या लढ्यात काँग्रेस नेहमीच पुढे असेल असं भाषण केलं. राहुल गांधी एवढ्या दिवसांनंतर आलेयत म्हटल्यावर ते देशभरातील मरगळलेल्या काँग्रेसजनांमध्ये नवीन जान फुंकतील आणि काँग्रेसला नवा कार्यक्रम देतील अशा आशेवर बसलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना जुनंच भाषण नवीन आवेगात ऐकून परतावं लागलं. नाही म्हणायला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भाषण जरूर केलं, पण अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होताना आणलेला हा आवेश सारखं सारखं बुंद से गई वो हौद से नहीं आती या म्हणीची आठवण करून देत होता. पहिल्या टप्प्यात गैरहजर राहणाऱ्या राहुल गांधींना आ...