Skip to main content

Posts

Showing posts with the label ravindra Ambekar

अमित शहा सक्रीय..ठाकरे सरकार पडणार का ?

Will Amit Shah topple MVA govt?  Analysis By Ravindra Ambekar. 

सरकारच्या विरोधात विद्रोह करा - पी चिदंबरम

Ravindra Ambekar interacting with Farmer

Interaction with Farmer 

पत्रकारितेची चिंता...

पत्रकारितेची चिंता... पत्रकारितेचं काय होणार याची सर्वांना चिंता लागली आहे, मला ही अंशी चिंता वारंवार सतावते. सरकार दमन करते म्हणून पत्रकारिता धोक्यात आहे असं म्हणणं मला धाडसाचं वाटतं. खर तर पत्रकारिता पत्रकारांमुळे सुद्धा धोक्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून मी नवोदीत तसंच वरिष्ठ पत्रकारांच्या नोकरीसाठी मुलाखती घेत आलोय. ओळख आहे म्हणून नोकरी मिळेलच अशा अपेक्षेने अनेक जण मुलाखत द्यायला येतात. मुलाखतींदरम्यान जे अनेक विषय माझ्या लक्षात आले ते थोडं संगतवार मांडण्याचा प्रयत्न करतो, मग पुढचा विषय मांडतो. मी सुद्धा नोकरीसाठी मुलाखती दिल्यायत. तो नर्वसनेस मी सुद्धा अनुभवलाय. काही ठिकाणी तर मला माझं प्रेझेंटेशनच करता आलं नाही. मी काय करू शकतो हे सांगता आलं नाही, आणि मी नोकरी मिळवण्यात फेल झालो. माझं म्हणणं असायचं की मला संधी द्या, आणि मी काय करू शकतो ते एकदा बघा, पण केवळ इतक्या भांडवलावर नोकरी मिळू शकत नाही हे मला टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसल्यानंतर समजायला लागलं. कॉन्फीडन्स हा भाग वगळला तरी काही बेसिक गोष्टी असतात ज्यावर  पत्रकारांनी लक्ष दिल पाहिजे. काम करता करता कॉन्फिडन्स येऊ शकतो म्ह...

दुुर्गीचं लग्न मोडा.....

“ सर, मी सात वर्षाची असताना लग्न झालं. आता मला समजतंय, मी कमवतेय. मला नकोय तो नवरा. मी नाही सांगीतलं, पण समाज ऐकत नाही. मला आता शिकायचंय, मोठं व्हायचंय. ”   दुर्गी शिर्के सांगत होती. दुर्गी संघर्ष करतेय स्वत : च्या ओळखीसाठी, नवीन आयुष्यासाठी. अशा अनेक दुर्गी आपल्या आसपास आहेत. आपण उगीचच सगळं काही ठीक चाललंय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलंच राज्य आलंय, लोकशाही आलीय, समस्या सुटू लागल्यायत या आनंदात जगतोय की काय असं वाटतं कधी कधी. दुर्गी शिर्के सध्या नोकरी करतेय. तिचा नवरा दारूडा आहे. तिला त्याच्या सोबत जायचं नाहीय, हे लग्नच मान्य नाहीय. पण ती सांगणार कुणाला, तिचं ऐकणार कोण, हा प्रश्न आहे. साहेब, आमची चूक झाली, पण आता आम्हाला त्या मुलाबरोबर पोरीला नांदवायची नाहीय. तो रोज दारू पिऊन दारावर येतो. गोंधळ घालतो. आम्हाला काय करावं सूचत नाहीय. दुर्गीची आई सांगत होती. दुर्गीची संपूर्ण कहाणी एका जिल्हाधिकारी असलेल्या मित्राला सांगून मदतीसाठी पुढची यंत्रणा जोडून दिली. पोलीसांकडून पण मदत मिळेल अशी व्यवस्था लाऊन दिली. हे सर्व होत असतानाच संध्याकाळी राष्ट्रसेवादलाची कार्यकर्ता असलेल...

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव...

डॉ आंबेडकर जयंती आणि गावगुंडांचं ब्रॅंडींग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनतेने जागोजागी उभारलेले पंडाल- लाऊड स्पीकर्स एव्हाना काढण्याचं काम सुरू असेल. साधारणत : एखादी व्यक्ती आपल्यात नसली की तिची उणीव ही आपल्याला काही दिवस- काही महिने जाणवते आणि मग आपण आपल्या कामाला सुरूवात करतो. पण जगाच्या इतिहासात अशीही एक व्यक्ती होऊन गेली की तिच्या नसण्यानंतरही वर्षानुवर्षे तिचे अनुयायी तिच्यावरचं प्रेम-कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या व्यक्तीचं नाव.  मध्यंतरीच्या काळात सोलापूरचे कलेक्टर तुकाराम मुंढे यांच्याशी बोलत होतो. काय काय नवीन योजना राबवतायत म्हणून चौकशा करत होतो. तेव्हा उल्लेखनीय बाब म्हणून त्यांनी ‘ वर्गणीदादांना ’ तंबी दिल्याची गोष्ट सांगीतली. मी एकदा सोलापूरमधून आंबेडकर जयंतीच्या दोन दिवस आधी प्रवास करत होतो. रात्री 12 वाजता एका रस्त्यावर माझी गाडी काही तरूणांनी अडवली होती. आंबेडकर जयंतीची वर्गणी दिल्याशिवाय गाडी सोडणार नाही म्हणत होते. 10-12 जण असतील. मी वर्गणी देणार नाही म्हटल्यावर त्यांचा  ...

शेतकऱ्यांच्या दु:खाचा पंचनामा

ए तू गप्प बस..... श्यू sssss श्यू SSSs सगळीकडून एकच गलका झाला. विशीचा एक तरूण शेतकरी काहीतरी बोलण्याचा, विचारण्याचा प्रयत्न करत असताना बाकीच्या शेतकऱ्यांनी त्याला गप्प बसवलं. वातावरण शांत झालं आणि मग मंत्रिमहोदयांनी परत बोलायला सुरूवात केली. गर्दीतला तो तरूण शेतकरी नंतर गप्प होऊन गर्दीचा भाग होऊन गेला. मंत्रिमहोदयांचा दौरा पुढे सुरू राहिला. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नाशिकचा दौरा केला. ते राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे कळताच मी त्यांना फोन केला, मी पण येतो सांगून सकाळीच नाशिक गाठलं. विमानतळापासून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जवळपास 20 गाड्या ताफ्यात होत्या. भला मोठा कॉन्वॉय निफाड परिसरातल्या गावांमधून धुरळा उडवत पुढे सरकत होता. आजूबाजूला द्राक्षांच्या बागा दिसत होत्या. बरंच नुकसान झालंय. रस्त्याच्या काठाला शेतकरी उभे होते सर्व बघत. आपल्या शेतात पण त्यांनी यावं म्हणून काहीजण निवेदनं घेऊन उभे होते. तर हे येऊन काय करणार असे ही भाव काहींच्या चेहऱ्यांवर दिसत होते. द्राक्ष आणि कांद्याचं मोठं नुकसान या भागात झालं. तसं...