Skip to main content

Posts

Showing posts with the label maharashtra

या महाराष्ट्राला आग लावा...!

या महाराष्ट्राला आग लावा...!  जय महाराष्ट्र, दगडांच्या देशा कणखर देशा... बघतोयस काय रागानं महाराष्ट्र मिळवलाय वाघानं अशा विविध संदेशांनी आपली छाती फुगत चालली आहे असं वाटत असेल तर आपल्याच कानाखाली दोन चार चापटी मारून भानावर या. अशाच तुताऱ्यांनी या महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलंय. या तुताऱ्यांच्या आवाजाखाली अनेक आवाज दबले गेले आहेत. ते ऐकले तर आपण ज्याला अभिमानास्पद बोलतो तो अभिमान किती पोकळ आहे हे ही लक्षात येईल. एखाद्या चांगल्या दिवशी काही तरी वाईट बोलायची खोड असते काही लोकांना, तशी ती मलाही आहे. त्यामुळेच आजच्या चांगल्या दिवशी वाईट बोलायचं ठरवलंय. सामान्यतः आपण ज्या भूप्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा अभिमान आपल्याला असतो. हा अभिमान कधी कधी त्या भूप्रदेशाच्या विकासाला दिशा देतो किंवा मग त्या प्रदेशातील अनेक गैरव्यवस्थांवर पांघरून घालायचं काम करतो. एकदा का हा अभिमान आपण स्वीकारला की मग अनेक गोष्टींची चर्चा करायची नाही आणि पुढे जायचं असं गृहीत धरलेले असते. सामान्य माणूस सामान्यतः आपला फायदा काय होणार आहे याचा व्यापक किंवा सूक्ष्म हिशोब लाऊन आपापल्या कुवतीप्रमाणे आपला प्रकार निवडत ...

ओवैसी आणि बरंच काही....

  owaisi brothers - messiha of Muslims?? " देशातले पोलीस पंधरा मिनिटांसाठी हटवा मग बघा.... " जाहीरपणे धमकी देणाऱ्या ओवैसीची आणखी एक व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे , ती म्हणजे महाशिवरात्रीला लोक उपवास करतात , जागरण करतात म्हणून दोन दिवसांची सुट्टी देण्याची मागणी करणारं अकबरूद्दीन ओवैसीचं भाषण. तर राज्यघटना , सुप्रीम कोर्टाच्या निर्णयचे दाखले , वेगवेगळ्या कमिट्यांचे दाखले देत विरोधकांना गप्प करणारे असदद्दुन ओवैसी .. ओवैसीची खरा चेहरा नेमका काय , काय आहे त्यांच्या मनात , काय आहे त्यांचा अजेंडा हे जाणून घ्यायची मोठी उत्सुकता होती. वांद्रे निवडणूकीच्या निमित्ताने असादुद्दीन ओवैसींना भेटण्याचा योग आला. मोठा ओवैसी म्हणजे अगदी भारदास्त- प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची विषयांची मांडणी अगदी सखोल. थोडक्यात विश्लेषण करायचं म्हणजे जुबान हम भी रखते हैं या एका वाक्यात असादुद्दीन आपलं धोरण आणि पुढच्या राजकारणाची दिशा सांगतात. ओवैसीना जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात खूप दिवसांपासून होती. गेले अनेक महिने मी त्यांच्या राजकीय प्रवास आणि निर्णयांचा बारकाईने अभ्यास करतोय. ओव...

डॉ आंबेडकर जयंती आणि गावगुंडांचं ब्रॅंडींग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनतेने जागोजागी उभारलेले पंडाल- लाऊड स्पीकर्स एव्हाना काढण्याचं काम सुरू असेल. साधारणत : एखादी व्यक्ती आपल्यात नसली की तिची उणीव ही आपल्याला काही दिवस- काही महिने जाणवते आणि मग आपण आपल्या कामाला सुरूवात करतो. पण जगाच्या इतिहासात अशीही एक व्यक्ती होऊन गेली की तिच्या नसण्यानंतरही वर्षानुवर्षे तिचे अनुयायी तिच्यावरचं प्रेम-कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या व्यक्तीचं नाव.  मध्यंतरीच्या काळात सोलापूरचे कलेक्टर तुकाराम मुंढे यांच्याशी बोलत होतो. काय काय नवीन योजना राबवतायत म्हणून चौकशा करत होतो. तेव्हा उल्लेखनीय बाब म्हणून त्यांनी ‘ वर्गणीदादांना ’ तंबी दिल्याची गोष्ट सांगीतली. मी एकदा सोलापूरमधून आंबेडकर जयंतीच्या दोन दिवस आधी प्रवास करत होतो. रात्री 12 वाजता एका रस्त्यावर माझी गाडी काही तरूणांनी अडवली होती. आंबेडकर जयंतीची वर्गणी दिल्याशिवाय गाडी सोडणार नाही म्हणत होते. 10-12 जण असतील. मी वर्गणी देणार नाही म्हटल्यावर त्यांचा  ...

शेतकऱ्यांच्या दु:खाचा पंचनामा

ए तू गप्प बस..... श्यू sssss श्यू SSSs सगळीकडून एकच गलका झाला. विशीचा एक तरूण शेतकरी काहीतरी बोलण्याचा, विचारण्याचा प्रयत्न करत असताना बाकीच्या शेतकऱ्यांनी त्याला गप्प बसवलं. वातावरण शांत झालं आणि मग मंत्रिमहोदयांनी परत बोलायला सुरूवात केली. गर्दीतला तो तरूण शेतकरी नंतर गप्प होऊन गर्दीचा भाग होऊन गेला. मंत्रिमहोदयांचा दौरा पुढे सुरू राहिला. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नाशिकचा दौरा केला. ते राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे कळताच मी त्यांना फोन केला, मी पण येतो सांगून सकाळीच नाशिक गाठलं. विमानतळापासून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जवळपास 20 गाड्या ताफ्यात होत्या. भला मोठा कॉन्वॉय निफाड परिसरातल्या गावांमधून धुरळा उडवत पुढे सरकत होता. आजूबाजूला द्राक्षांच्या बागा दिसत होत्या. बरंच नुकसान झालंय. रस्त्याच्या काठाला शेतकरी उभे होते सर्व बघत. आपल्या शेतात पण त्यांनी यावं म्हणून काहीजण निवेदनं घेऊन उभे होते. तर हे येऊन काय करणार असे ही भाव काहींच्या चेहऱ्यांवर दिसत होते. द्राक्ष आणि कांद्याचं मोठं नुकसान या भागात झालं. तसं...