बदल हा कुठल्याही प्रगतीशील समाजाचा स्थायीभाव असतो. यंदांच्या निवडणुकीत भारतातील सुज्ञ समाजाने मतदानयंत्राच्या माध्यमातून बदल घडवली. होणारा बदल नेहमीच चांगला असतो असं मानायचं ही काही कारण नाही. जनतेने घडवलेला बदल चांगला आहे की वाईट हे कळायला अजून थोडा वेळ या सरकरला द्यायला हवा या मताचा मी आहे. दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनल्यानंतर अनेक लोकांनी माझ्याशी वाद धातला होता. मोदींच्या कडे पाहण्याचा तुमचा चष्मा तुम्ही बदलला पाहिजे असं अनेकांचं मत होतं. मला वाटत होतं, अजून मोदी पंतप्रधान बनायला प्रगल्भ झालेले नाहीत. माझं राहुल गांधींच्या बाबतीत ही हेच मत आहे. मोदींना अजूनही बराच टप्पा गाठायचाय असं माझं मत होतं. प्रगल्भता ही काही वयाने येत नाही, मोदींचा सर्व अनुभव हा राज्यातलं एक सरकार जबरदस्त मार्केटींगच्या साह्याने चालवण्याचा होता. मोदींचा गुजरात म्हणजे गुड गवर्नन्स आणि लोकशाहीचा आदर्श घ्यावा असं राज्य आहे असं कुणी तेव्हाही म्हणत नव्हत आणि आता तर काही जण उघडपणे मोदींचं गुजरात मॉडेल फसवं असल्याचं बोलू लागलेयत. मोदींचं मार्केटींग, टायमिंग आणि प्लानिंग जबरदस्त...
Nothing to Lose...!!!