Skip to main content

नरेंद्र मोदी....मोठा भीम आणि मोठा पप्पू

बदल हा कुठल्याही प्रगतीशील समाजाचा स्थायीभाव असतो. यंदांच्या निवडणुकीत भारतातील सुज्ञ समाजाने मतदानयंत्राच्या माध्यमातून बदल घडवली. होणारा बदल नेहमीच चांगला असतो असं मानायचं ही काही कारण नाही. जनतेने घडवलेला बदल चांगला आहे की वाईट हे कळायला अजून थोडा वेळ या सरकरला द्यायला हवा या मताचा मी आहे.
दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनल्यानंतर अनेक लोकांनी माझ्याशी वाद धातला होता. मोदींच्या कडे पाहण्याचा तुमचा चष्मा तुम्ही बदलला पाहिजे असं अनेकांचं मत होतं. मला वाटत होतं, अजून मोदी पंतप्रधान बनायला प्रगल्भ झालेले नाहीत. माझं राहुल गांधींच्या बाबतीत ही हेच मत आहे. मोदींना अजूनही बराच टप्पा गाठायचाय असं माझं मत होतं. प्रगल्भता ही काही वयाने येत नाही, मोदींचा सर्व अनुभव हा राज्यातलं एक सरकार जबरदस्त मार्केटींगच्या साह्याने चालवण्याचा होता. मोदींचा गुजरात म्हणजे गुड गवर्नन्स आणि लोकशाहीचा आदर्श घ्यावा असं राज्य आहे असं कुणी तेव्हाही म्हणत नव्हत आणि आता तर काही जण उघडपणे मोदींचं गुजरात मॉडेल फसवं असल्याचं बोलू लागलेयत. मोदींचं मार्केटींग, टायमिंग आणि प्लानिंग जबरदस्त होतं. याच गुणांवर तुम्ही पंतप्रधान बनायला लायक होता असं नाही.
मोदींनी देशातील मध्यमवर्गाला, तरूणाला खूप स्वप्न दाखवली. तुम्हाला रोजगार नाही.. मी मिळवून देतो, शास्त्रज्ञांना लॅब नाही.. मैं हूँ ना..., शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही? ... मी देतो...! मोदींच्या जादूच्या छडीच्या गारूडाला भाळलेल्या लोकांनी मोदींना डोक्यावर बसवलं. काँग्रेसचा डब्यात गेली.
मोदी कसे निवडून आले यावर आता फार बोलणं योग्य होणार नाही. मोदींचं राज्य आल्यानंतर वर्ष होत आलं. हे वर्ष कसं गेलं हे मोदी मोदी करणाऱ्यांना कळणारही नाही एवढ्या धडाक्यात मोदी काम करतील अशी मला आशा होती. मध्यंतरीच्या काळात काही मोदी समर्थक त्यांच्या परदेश दौऱ्याच्या मुद्दयावरून चिंता व्यक्त करीयचे, उगीच निवडून दिलं, आता गल्लीत तोंड दाखवणं मुष्कील झालंय असं सर्रास बोलीयचे. उलट त्यावेळेस मीच त्यांना सांगायचो काही तरी स्ट्रॅटेजी असेल वाट पाहा. अजून वर्षही झालं नाहीय. मला वाटतं प्रशासनाला नवीन कार्यपद्धत शिकायला वेळ लागेल. तो वेळ आजही द्यायला हवा असं मला वाटतं.
मोदींच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्र्यांच्या स्पाइंगचा विषय आला. मंत्र्यांच्या कारभारावर, बैठकांवर गुप्तहेरांमार्फत नजर ठेवण्यात येत असल्याच्या बातम्या आल्या. स्मृती इराणींच्या शिक्षणाचा, नंतर सेनगांवकर- काकोडकरांसोबतच्या वादाच्या बातम्या आल्या, मंत्रिमंडळातले सदस्य- खासदार यांचे वेडेवाकडे निर्णय- वक्तव्य. मोदींचे भपकेबाज परदेश दौरे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामांच्या भेटी दरम्यानचं अति जवळीक, नरेंद्र दामोदरदास मोदी अक्षरं लिहिलेला सूट, नितिन गडकरींची रोजची वक्तव्य... आणि त्यानंतर भूसंपादन कायद्यावरून थालेला वाद... सरकारची लाइन अँड लेन्थ बिघडताना दिसू लागली होती.
मोदींनी मिडीया विकत घेतला अशी बोंब ठोकली गेली होती. काही मिडीया हाऊसेस मोदींचा प्रचार करतात असा आरोप झाला, मधल्या काळात या मोदी-मिडीयामध्ये आणि देशाच्या अर्थकारणाची कथित दिशा ठरवणाऱ्या गुलाबी वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा मोदींच्या सरकारवर टिका होऊ लागली. अर्थव्यवस्थेची दिशा भरकटल्याचा आरोप होऊ लागला. एक वेळ याला आपण कॉर्पोरेटस ची ओरड म्हणू, पण ज्या कॉर्पोरेटसनी मोदींना भरभरून दिलं तेच एक वर्षाच्या आत बोंब का मारायला लागले. त्यांच्या मागण्या मोदी मान्य करत नाहीयत असं काही आहे का? कॉर्पोरेटस कधीच कुणाचे नसतात. त्यांना वाटलं होतं मोदींच्या राज्यात रेड कार्पेट असेल, जे गुजरात मध्ये झालं ते देशभर होईल. नकाशावर बोट ठेवलं ती जागा आपल्याला मिळेल, सवलती मिळतील, वीज मिळेल मग रोजगार निर्मितीचं गाजर दाखवून कामगार मिळवता येतील, जनभावना सोबत घेता येईल, थोडक्यात फायदा मिळवता येईल. कॉर्पोरेटस ना आपली इन्वेस्टमेंट योग्य ठिकाणी झालीय की नाही याची शंका यायला लागलीय.
शेतकरी- कामगार आणि युवकांमध्ये ही फार नैराश्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांना वाटलं होतं आता सगळं ठिक होणार आहे परंतु सत्तेत आल्यानंतरच्या मोदी सरकारच्या कृषीविषयक धोरणामध्ये धोरणाचा अभाव दिसली. दुष्काळी- अवकाळीच्या स्थितीत गोंधळलेल्या मोदी सरकारला शरद पवारांचा टेकू घ्यावा लागला यतच सर्व काही आलं. आपण हे करू ते करू असं गाजर दाखवणाऱ्या मोदींना पवारांची मदत घ्यायला लागले यातच बरंच काही आलं.
वर्ष सरायच्या आतच शेतकरी संघटनेने मोदींच्या विरोधात हत्यार उपसलं. यांना एका वर्षाच्या आतच सत्तेचा माज आला अशी टीका राजू शेट्टींनी केलीय. लाल दिवा नाही मिळाला म्हणून शेट्टींची ओरड आहे अशी समजूत करून घ्यायला ही मी तयार आहे. भूसंपादन बिलावरून राहुल गांधीही आक्रमक झाले. संपलेला विरोधी पक्ष जीवंत झाला. सत्ताधारी पक्षातील खासदारांची व्यथा राहुल गांधी बोलतायत अशी दबकी प्रतिक्रीया भाजपच्या नेत्यांमधून येऊ लागलीय. अशातच अरूण शौरींनीही विरोधकांना रसद पुरवायचं काम केलंय.
सत्तेत अनेक वर्षे काढल्यानंतर काँग्रेसची जी अवस्था झाली होती ती भाजपची एक वर्षातच झाली नाही ना अशी शंका येते.
काँग्रेसमधले अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी उलट सुलट वक्तव्य करत सरकारला स्वत:च वादात टाकलं होतं. भाजपकडे दिग्वीजय सिंह नाहीयत पण साक्षी महाराज आणि तत्सम नेत्यांची मोठी फौजच आहे. भाजपकडे कपिल सिब्बल नाहीत पण गडकरी आहेत. आडवाणी- राजनाथ सिंह- सुषमा स्वराज  कँप मोदींची लोकप्रियता कधी ओहोचीस लागतेय याची जणू वाटच पाहतोय.
पंतप्रधान म्हणून मोदींनी या वर्षात कय दिशा दिली या एका प्रश्नावर आता भाजपवाले आणि मोदी-मोदी वाले धड उत्तर देऊ शकत नाहीत. मोदींनी काय केलं पाहिजे याचा सल्ला आपण कुणीच आत्ता देऊ शकत नाही. मोदींची धोरणं योग्य असतीलही. मोदी-मोदीवाल्यांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेसच्या कुप्रशासनाची आपल्याला एवढी सवय झालीय की मोदींनी केलेली साफसफाई बघायला आता केवळ चष्माच नाही तर नजर बदलावी लागेल. मी हळूहळू नजर बदलतोय. मला मोदींचं काम स्पष्ट दिसू लागलंय. मोदींच्या सूटावर नरेंद्र दामोदरदास मोदी अशी अक्षरं नव्हतीच लिहिलेली. तो सूट ही मोदींनी घातलेला नव्हता. मला नवीन नजरेतून मोठा भीम अशी अक्षरं लिहिलेला सूट घातलेला मोठा पप्पू समोर दिसतोय. निदान एक वर्षभरात हा बदल घडलाय.

Comments

Popular posts from this blog

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्...

It’s Time for Semi-Rural Urbanization

  Don’t Welcome the Rat Race: It’s Time for Semi-Rural Urbanization   Having traveled across Maharashtra, I’ve seen it all—the bustling streets of Mumbai, the semi-urban chaos of mid-sized towns, and the forgotten corners of rural villages. There’s one glaring pattern: we are building an unsustainable future. Our cities are suffocating, and our villages are simmering with problems that could explode any moment.   Ravindra Ambekar with Dr Rajendra Singh inspecting water crisis  Just last week, Mumbai made headlines again for its pollution crisis. The air quality index (AQI) touched hazardous levels in several areas, making it almost impossible to breathe. Roads choked with vehicles, unchecked construction, and industrial pollution make this city—once known for its charm—one of the least livable urban centers in India. Yet, people continue flocking here, escaping rural struggles, only to sign up for life in a toxic gas chamber.   The Hidden Crises of Rural M...

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. प...