Skip to main content

Posts

Showing posts with the label Dalit

मराठ्यांचा अणुबाँब

मराठ्यांचा अणुबाँब लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरतोय. या समाजात प्रचंड ताकद आहे. कधी लढवय्या, सधन-निर्धन शेतकरी असलेला हा समाज कालांतराने शासक आणि 'व्यवस्था' बनला. भिडायची सवय, टोकाची अस्मिता, जय शिवाजी म्हटलं की सळसळणारं रक्त, जातीचा प्रचंड अभिमान असा हा मराठा अर्थ-सत्ता आणि समाजकारणातील महत्वाचा घटक बनला. जागतिक अर्थव्यवस्था बदलत असताना काही लोकांनी कालानुरूप बदल केले, काहींना यागोष्टींची हवा लागली नाही. ज्यांना हवा लागली नाही ते आज रस्त्यावर आहेत. शेतजमीनीचे तुकडे पडले, बदलत्या निसर्गचक्रामुळे शेती बेभरवश्याची झाली. त्यामुळे शेती किंवा शेतीवर मजूरी करूनही चांगले पैसे मिळवणारा समाज हळूहळू गरीब होत गेला. मिश्यांचा पिळ कायम राहावा म्हणून कर्जबाजारी होत गेला. 'अख्खा गाव मामाचा, पण कोण नाही कुणाचा!' अशी स्थिती आज मराठा समाजाची झाली आहे. मराठा समाजाच्या गरिबीचं खोलात जाऊन असं बरंचंस विश्लेषण करता येऊ शकेल. कोपर्डीच्या निमित्ताने राग व्यक्त करण्यासाठी हा अस्वस्थ समाज बाहेर पडला आणि हळूहळू तुंबलेली सगळी अस्वस्थता बाहेर यायला लागली. मराठा अशी 'जात' च...

Bihar results and national politics

माइलस्टोन.. निवडणूका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आणि प्रचार-अपप्रचार होत राहतो. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदींच्या अभूतपूर्व नेतृत्वाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेक जण आसुसले होते. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपचा अश्वमेध सुसाट जाईल असा कयास होता पण या अश्वमेधाची लगाम दिल्ली आणि पाठोपाठ बिहार मध्ये खेचली गेली. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं या अश्वमेधावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पैकी बिहारची निवडणूक फारच रंगतदार झाली. प्रचारामध्ये स्वत :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे कॅप्टन अमीत शहा. समोर लालू-नितीश कुमार आणि काँग्रेसचं महागठबंधन. मोदींनी ही पासवान-कुशवाह-मांझी अशी भट्टी जमवून जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न केला. दिसायला हे गणित अटी-तटीचं होतं. एक्झिट पोलचे निकाल तर गोंधळात टाकणारेच होते. पण मतदार मात्र गोंधळलेला नव्हता हे ईव्हीएम खोलल्यानंतर स्पष्ट झालं. लालू- नितीश-काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मोदींचा डब्बा गुल झाला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासात निवडणूक विश्लेषकांनी टीव्हीच्या स्क्रीनवर प्रचंड गोंधळ उडवून दिला. प...

डॉ आंबेडकर जयंती आणि गावगुंडांचं ब्रॅंडींग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनतेने जागोजागी उभारलेले पंडाल- लाऊड स्पीकर्स एव्हाना काढण्याचं काम सुरू असेल. साधारणत : एखादी व्यक्ती आपल्यात नसली की तिची उणीव ही आपल्याला काही दिवस- काही महिने जाणवते आणि मग आपण आपल्या कामाला सुरूवात करतो. पण जगाच्या इतिहासात अशीही एक व्यक्ती होऊन गेली की तिच्या नसण्यानंतरही वर्षानुवर्षे तिचे अनुयायी तिच्यावरचं प्रेम-कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या व्यक्तीचं नाव.  मध्यंतरीच्या काळात सोलापूरचे कलेक्टर तुकाराम मुंढे यांच्याशी बोलत होतो. काय काय नवीन योजना राबवतायत म्हणून चौकशा करत होतो. तेव्हा उल्लेखनीय बाब म्हणून त्यांनी ‘ वर्गणीदादांना ’ तंबी दिल्याची गोष्ट सांगीतली. मी एकदा सोलापूरमधून आंबेडकर जयंतीच्या दोन दिवस आधी प्रवास करत होतो. रात्री 12 वाजता एका रस्त्यावर माझी गाडी काही तरूणांनी अडवली होती. आंबेडकर जयंतीची वर्गणी दिल्याशिवाय गाडी सोडणार नाही म्हणत होते. 10-12 जण असतील. मी वर्गणी देणार नाही म्हटल्यावर त्यांचा  ...