Skip to main content

Posts

Showing posts with the label journalism

पत्रकारितेची चिंता...

पत्रकारितेची चिंता... पत्रकारितेचं काय होणार याची सर्वांना चिंता लागली आहे, मला ही अंशी चिंता वारंवार सतावते. सरकार दमन करते म्हणून पत्रकारिता धोक्यात आहे असं म्हणणं मला धाडसाचं वाटतं. खर तर पत्रकारिता पत्रकारांमुळे सुद्धा धोक्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून मी नवोदीत तसंच वरिष्ठ पत्रकारांच्या नोकरीसाठी मुलाखती घेत आलोय. ओळख आहे म्हणून नोकरी मिळेलच अशा अपेक्षेने अनेक जण मुलाखत द्यायला येतात. मुलाखतींदरम्यान जे अनेक विषय माझ्या लक्षात आले ते थोडं संगतवार मांडण्याचा प्रयत्न करतो, मग पुढचा विषय मांडतो. मी सुद्धा नोकरीसाठी मुलाखती दिल्यायत. तो नर्वसनेस मी सुद्धा अनुभवलाय. काही ठिकाणी तर मला माझं प्रेझेंटेशनच करता आलं नाही. मी काय करू शकतो हे सांगता आलं नाही, आणि मी नोकरी मिळवण्यात फेल झालो. माझं म्हणणं असायचं की मला संधी द्या, आणि मी काय करू शकतो ते एकदा बघा, पण केवळ इतक्या भांडवलावर नोकरी मिळू शकत नाही हे मला टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसल्यानंतर समजायला लागलं. कॉन्फीडन्स हा भाग वगळला तरी काही बेसिक गोष्टी असतात ज्यावर  पत्रकारांनी लक्ष दिल पाहिजे. काम करता करता कॉन्फिडन्स येऊ शकतो म्ह...

थोडंसं इंटेलेक्च्य़ुअल

पत्रकार दिनाच्या शुभेच्छा। आपणच आपली कधीतरी पाठ थोपटून घ्यायची संधी तशी फार कमी मिळते. पण कुणीतरी कान ही पिळायला हवा कधी तरी। ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय कमी झालेयत तसं, कान पिळू शकणारे हात कमी झालेयत, खेदानं म्हणावं लागतंय. पण वस्तुस्थिति आहे. त्याला काय करणार. पत्रकारांना ज्ञान शिकवायची माझी औकात नाही. औकात शब्द ह्यासाठी वापरतो की आपण पत्रकार झाल्यानंतर आपल्याला पहिलं लाइसन्स मिळतं ते लोकांची औकात काढायचं. अनेक जण तर लोकांची औकात काढण हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे वागतात. आपल्याला पत्रकार म्हणून घटनेने काय अधिकार दिलेयत.. आपण जर पाहिलं तर पत्रकारांना कुठल्याही विशेषाधिकाराचं कवच घटनेने दिलेले नाही. एवढचं काय पत्रकारांना हल्ल्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून कायदा करावा, अशी मागणी झाली. मी त्या कायद्याचा मसुदा तयार करणाऱ्या समितीत होतो म्हणून मला बारकाईनं माहीत आहे सगळं, हा कायदा होऊ नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. पत्रकारांमध्ये पत्रकारांच्या व्याख्येवरून फुट पाडली, कुमार केतकरांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर तयार झालेली ही समिती पत्रकारांना दाखवल...