Skip to main content

Posts

गांडू बगिचा

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका राजकारण्याने बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्तानं उद्भवलेल्या वादावर बोलताना तांडव करण्याची धमकी दिलीय. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लिहायला भीती वाटायला लागलीय. तांडव झालं तर कदाचित त्यांच्या पक्षाची जशी स्थिती झाली तशी स्थिती महाराष्ट्राची झाली तर हे नुकसान सध्याच्या मंदीच्या काळात राज्याला आणि देशाला परवडणारं नाही. आपल्या आवाक्यातल्या धमक्या दिल्या पाहिजेत हे पण आता काही लोकांना समजेनासं झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासातील महापुरुषांचं गुणगौरव करणाऱ्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या. इतिहास नीटपणे लिहीला गेला नाही पण बखरी मात्र बख्खळ झाल्या. इतिहासाचे आपापल्या बुद्धीला पटतील तेवढे आणि तसे दाखले देऊन टाळ्या मिळवणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. इतिहासलेखनाचं काम, शास्त्रीय पद्धत, पुरावे शोधणं, ते नीट मांडणं याचं काम नीट पणे झालं नाही असा एक जुना आक्षेप आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केलं त्या पुण्या- मुंबईच्या संस्थांच्या अधिकाराला आव्हान देणारी नवीन पिढी आता जन्माला आलीय आणि ती आपल्या पद्धतीने इतिहास वाचण्याचा प्रयत्न करते आहे, शोधण्याचा प्रयत्...

In The country of "KAMSUTRA"

कामसूत्राच्या देशात... कामसूत्र आणि खजुराहोच्या देशात सध्या काय चाललंय असा प्रश्न अनेकांना सध्या पडलाय. असं काय झालं अचानक की सरकारने पॉर्नबंदीचा निर्णय घेतला असावा ?  गेल्या काही दिवसांपासून दररोज अनेक प्रश्न पडायला लागलेयत. एक संपला नाही तर दुसरा असे आपल्या सामान्य जीवनाशी संबंध नसलेले अनेक विषय सध्या चर्चेला येतायत. या तत्कालिक विषयांच्या प्रेमात पडायचं नाही असं मी बऱ्याचदा ठरवतो. देशातील महत्वाच्या समस्या आणि दुखणी संपलीयत की काय असं वाटावं इतकी चर्चा या विषयांवर होते. त्यामुळे देशासमोर जे महत्वाचे विषय आहेत त्यांच्यावरचं लक्ष भरकटतं असं माझं मत झालंय. देशासमोर महत्वाच्या विषयांवर सरकारला कदाचित चर्चा टाळायची असेल आणि म्हणून जेव्हा जेव्हा मोठा वाद देशामध्ये उफाळून येतो तेव्हा तेव्हा त्या वादांना काही फुटकळ मुद्द्यांनी मारलं जातं. लोकसभेमध्ये मूठभर विरोधकांनी सरकारच्या नाकी नऊ आणलेलं असताना अचानक महत्वाच्या सर्व्हिस प्रोवायडर्स नी पॉर्न साइटस बंद केल्याच्या बातम्या यायला सुरूवात झाली. या बातम्यांनी राष्ट्रीय चर्चेचं स्वरूप घेतलं. पॉर्न साइट वर बंदी आल्यामुळे उपासमार होऊन मर...

बात मुसलमान की नहीं.....

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे दु:खद निधन झालं आणि सर्व देश शोकाकुल झाला. सोशल मिडिया असो नाहीतर चावडीवरच्या गप्पा, कलाम यांच्या जाण्याने सर्वांचेच डोळे पाणावल्याचं दिसत होतं. हल्लीच्या काळात फार कमी लोकांच्या वाट्याला हे भाग्य येतं. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाची उंची नजिकच्या भविष्यात कुणी गाठू शकेल असं वाटत नाही. मनाला चटकन लावून जाणारी त्यांची एक्जीट. शेवटचा क्षण ही ते लोंकांसाठी जगले. डाॅ कलाम यांना श्रद्धांजली देणारे शेकडों मेसेजेस सोशल मिडियावर दिवसभर एकमेकांना पाठवले जात होते. त्यातलाच एक मेसेज धक्कादायक होता देख ले ओवैसी आज पुरा देश एक सच्चे मुसलमान के लिए रो रहा है बात मुसलमान की नहीं देश के साथ इमान की है! पाहायला गेला कर साधासा मेसेज, कुणीही सहज दुसऱ्याला फाॅरवर्ड करेल असा. एका सोशल मिडिया ग्रुप वर हा मेसेज आल्यानंतर माझ्या एका मुस्लीम मित्राने मला फोन केला. प्रचंड अस्वस्थ होता तो. मी त्याला अस्वस्थतेचे कारण विचारले. तो म्हणाला कलाम गेले याचं दु:ख करायला भारतीय असायला लागेल की, दु:ख जस्टीफाय करायला ते देशप्रेमी मुस्लीम होते हे सांगावं लागेल? अशा पोस्ट मागे ने...

मोदी कधी कधी हिटलर आहेत...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलरशाही राबवतायत असं मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या स्नेहल आंबेकर यांनी म्हटलं. तसा स्नेहल आंबेकर यांचा राजकीय जीव लहानच. त्यांच्या वक्तव्याची फार कुणी दखल घ्यावी अशी स्थितीही नाही. शिवसेनेतही त्यांच्या मताला फार काही किंमत दिली जात असेल अशी ही स्थिती नाही. अचानक त्यांचं एक वक्तव्य ते ही देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीतलं माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनतो. मध्यंतरी राज पुरोहीत यांच्या स्टींग ऑपरेशन नंतर भाजपचा मुखवट्याआड असलेला चेहरा उघड झाला असं बोललं जात होतं, अचानक स्नेहल आंबेकर यांच्या वक्तव्यामुळे मोदींच्या कार्यपद्धतीवर चर्चा सुरू झाली, शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी तर कमळावरच बाण चालवले. सत्तेत असणाऱ्यांचा जीव सत्तेपासून एवढ्या लवकर उबगण्याची नक्की काय कारणं असावीत असा प्रश्न मला सातत्याने पडतो. विरोधी पक्षात असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक प्रचाराच्या दरम्यान उचललेल्या प्रश्नांची तातडीने उकल हवी होती. सत्ता आली त्यानंतर जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व प्रश्न सुटतील असं या आमदारांना- नेत्यांना वाटत होतं. राज...

ऐसे कैसे जाले भोंदू

  कुंभमेळ्यासाठी कमी काळात जर या देशातील प्रशासन एखाद्या शहराचा चेहरा बदलण्याची ताकद ठेवत असेल तर मग ज्या शहरांचं, गावांचं आरोग्य बिघडलंय तेही दुरुस्त करण्याची ताकद इथल्या प्रशासनात आहे, हे नाकारून चालणार नाही.    सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झालीय, जवळपास तीन महिने हा दिव्य सोहळा नाशिकमध्ये चालणार आहे. गेल्याच आठवड्यात नाशिकमध्ये जाऊन आलो, प्रशासनाने केलेली भव्य दिव्य तयारी पाहिली. नाशिकच्या कुंभमेळ्यावर होत असलेला खर्च आणि आयोजन पाहिल्यानंतर या देशाला कधीच मंदी स्पर्श करू शकणार नाही असं वाटतं. प्रचंड पैसा खर्च करून नाशिकचे रस्ते चकाचक करण्यात आलेयत. साफसफाई करण्यात आलीय, झाडांची कटाई करण्यात आलीय. सर्व काही मस्त दिसत होतं.  कुंभमेळ्याच्या निमित्तानं लाखो लोक नाशिकमध्ये येणार, राहणार म्हणून विशेष तयारीसाठी गेले काही महिने प्रशासन दिवसरात्र काम करतंय. कुंभमेळ्यासाठी विशेष मंत्री पण नेमण्यात आलेला असल्याने समन्वयाची चिंताच नाही. बैठक घेऊन लगेचच निर्णय घेतले जातात आणि त्याची अमलबजावणीही लगेच होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही बरीच काळजी घेण्यात आलीय. दहशतवादी हल्ला ...

स्वच्छ महाराष्ट्र अभियान

समोसे में आलू

समोसे में आलू...  आटपाट नगराचा राजा कुणी बनायचं यावर चर्चा चाललेली असताना अचानक चर्चेतल्या नावांना बाजूला सारून आणि विरोधकांचं शिरकाण करून एखादा नवीनच राजा उद्याला येतो... सगळीकडे त्याचं गुणगान सुरू असतं. सर्वांत ताकदवर राजा कुणीही विरोधक शिल्लक नाही अशा वेळी हा राजा आपल्या मित्रांना पण भाव द्यायला तयार नसतो. अशा वेळी चिंध्या-चिध्या उडालेल्या विरोधकांतील एक सरदार राजाला न मागीतलेला पाठिंबा देतात. या सरदाराच्या सैन्यातल्या प्रमुख शिलेदारांवर अन्यायी- जुलुमी- भ्रष्टाचारी म्हणून आरोप झालेले असतात. तरी सुद्धा राजाला ममत्व भावना निर्माण होते आणि राजा या पराभूत सरदाराला आपला गुरू मानतो. गुरू सरदार मोठ्या मनाने झालेला पराभव, पडझड, नुकसान यासाठी राजाला माफ करत राजाला आपलं म्हणतो. आणि राजाचं राज्य सुरू होतं.  इथे पराभूत झालेल्या इतर सरदारांना खूप आश्चर्य वाटतं. ते गुरू सरदारा कडे येतात आणि विचारतात की तुम्ही आता राजा सोबत आहात का.. गुरू सरदार थोडंसं हसतात. पराभूत सैन्यातील इतर सरदारांच्या पाठिवर हात फिरवून सांगतात. राजाला मार्गदर्शनाची गरज असते अधेमधे. बाकी मी पराभूत झालेला अ...