Skip to main content

Posts

दगड....

मागच्या आठवड्यात पत्रकार संघात गेलो. सहज नाही, ठरवूनच..एक पत्रकार परिषद अटेंड करायला. पत्रकार परिषद होती मेधा ताईंची. मी काही कव्हर करायला गेलो नव्हतो, ताईंना भेटायचं होतं, बरेच दिवस झाले भेटलो नव्हतो, हेतू होता मेंदूतले ब्लॉकेज काढून मेंदूला जरा  चालना मिळावी.. नर्मदे नंतर आता ताई मुंबईच्या झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नात गुतल्यायत. मला कससंच वाटलं.कससंच का वाटलं ते सविस्तर सांगेनच...      पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून ताई दुसरी कडे जाणार होत्या. ताईंच्या नेहमीच्या स्टाइलप्रमाणे त्यांनी जवळपास सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांना स्टेज वर बसवलं होतं. बाकीचे अगदी स्वत:ची नैतिक जबाबदारी असल्याप्रमाणे प्रेसनोट वाटप आणि चहा वाटपाचं काम करत होतं. आंदोलनाचं सूक्ष्म नियोजन काय असतं ते इथं समजत. प्रत्येकाकडे काही ना काही काम असतंच.ताई मध्येच जाणार म्हणून माझीही चूळबूळ सुरू होती बाहेर पडण्यासाठी. म्हणून आधीच बाहेर पडावं म्हणून मी उभा राहीलो, तोच ताईंनी मला अडवलं. रवी भाऊ आपण बसा ना.. हे लोक पत्रकार परिषद पुढे सुरू ठेवतील. यांचंही ऐका..मला घाई आहे निघायच...

national park

Netizen Ravindra Ambekar.

माझ्या एका मित्राने नेटवर उपलब्ध असलेल्या माझ्याबाबतच्या माहीती, बातम्यांच्या काही लिंक्स मला पाठवल्या.... मजा आहे... http://www.media.visfot.com/index.php/breaking_news/3518.html http://ibnlive.in.com/news/govt-gives-vidarbha-farmers-rs-13-compensation/55958-3.html http://ibnlive.in.com/news/malegaon-blast-struggling-to-cope/21117-3.html http://khabar.ibnlive.in.com/blogs/author/57.html http://www.mumbaimonsoon.com/Contact_Us_4-8-09/MEDIA.php http://www.bhadas4media.com/dukh-dard/6048-attacks-on-journalists.html http://no1journalist.com/site-content.php?SiteContentID=19 http://ibnlive.in.com/news/mcvada-whats-cooking-between-shiv-sena-and-macs/70539-7.html http://www.hindustantimes.com/tabloid-news/mumbai/Now-watch-civic-general-body-meetings-on-TV/Article1-531421.aspx http://ibnlive.in.com/news/shooting-in-malegaon-having-a-blast/21540-8.html http://en.cyclopio.com/List%20of%20Marathi%20people http://www.expressindia.com/latest-news/enact-law-for-journalists-...

थोडसं इंटेलेक्च्युअल - 2

पत्रकार दिनाच्या दिवसाचं निमित्त साधून जे काही मत व्यक्त केलं, त्यानंतर मोजक्याच पण पुरेश्या बोलक्या प्रतिक्रीया आल्या. एक प्रतिक्रीया आली पत्रकार गोविंद तुपे यांची. त्यांनी मत व्यक्त केलं की लेख वाचून डोकं भंजाळून गेलं. पत्रकारांनांच्या प्रस्थापित होण्याबाबतच्या या लेखाने ते अस्वस्थ झाले.. मला वाटतं ह्यापेक्षा आणखी दुसरा कुठलाही भाग - दुसरा या लेखाला असणं शक्य नाही.

थोडंसं इंटेलेक्च्य़ुअल

पत्रकार दिनाच्या शुभेच्छा। आपणच आपली कधीतरी पाठ थोपटून घ्यायची संधी तशी फार कमी मिळते. पण कुणीतरी कान ही पिळायला हवा कधी तरी। ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय कमी झालेयत तसं, कान पिळू शकणारे हात कमी झालेयत, खेदानं म्हणावं लागतंय. पण वस्तुस्थिति आहे. त्याला काय करणार. पत्रकारांना ज्ञान शिकवायची माझी औकात नाही. औकात शब्द ह्यासाठी वापरतो की आपण पत्रकार झाल्यानंतर आपल्याला पहिलं लाइसन्स मिळतं ते लोकांची औकात काढायचं. अनेक जण तर लोकांची औकात काढण हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे वागतात. आपल्याला पत्रकार म्हणून घटनेने काय अधिकार दिलेयत.. आपण जर पाहिलं तर पत्रकारांना कुठल्याही विशेषाधिकाराचं कवच घटनेने दिलेले नाही. एवढचं काय पत्रकारांना हल्ल्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून कायदा करावा, अशी मागणी झाली. मी त्या कायद्याचा मसुदा तयार करणाऱ्या समितीत होतो म्हणून मला बारकाईनं माहीत आहे सगळं, हा कायदा होऊ नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. पत्रकारांमध्ये पत्रकारांच्या व्याख्येवरून फुट पाडली, कुमार केतकरांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर तयार झालेली ही समिती पत्रकारांना दाखवल...

विकास की नई परिभाषा..।

जो हमेशा होता है वो इस बार भी हुआ। देश के कृषि मंत्री शरद पवार ने मीडिया को जमकर कोसा। मीडिया विकास का विरोधी है, विकास की दृष्टि नहीं हैं मीडिया के पास और न जाने क्या- क्या...। पवार साहब राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष हैं, लंबे समय तक महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं। उनकी मर्जी के बगैर महाराष्ट्र में कुछ नहीं हो सकता ये भी सब जानते हैं। विकास की ही तड़प थी कि उन्होंने हेलिकॉप्टर से यात्रा के समय पुणे की वो जमीन देखी जहां पर नए भारत का एक नया शहर, सपनों का शहर बसाया जा सकता है। देश के विकास में योगदान देने की तड़प उन्होंने अपने परममित्र अजित गुलाबचंद जो एचसीसी कंपनी के मालिक हैं उन्हें बताई। एक ऐसा शहर जहां पर सब कुछ होगा। घर होंगे, मॉल होंगे, ऑफिस होंगे, थिएटर होंगे...मतलब किसी भी काम के लिए आपको वहां से बाहर जाने की जरूरत नहीं है। सारी सुख सुविधाएं अंतरराष्ट्रीय दर्जे का एक शहर का नाम होगा लवासा। सपना पवार साहब का हो और सच कैसे ना हो। लवासा के लिए जमीन का जुगाड़ शुरू हो गया। टूरिज्म, हिल स्टेशन और ऐसे कई कारणों के लिए किसान और आदिवासों की जमीन ली गई। बैकवॉटर वाली जमीन भी भ...

39 एके 39....39 दुणे...

मध्यंतरी नागपूर ला गेलो होतो हिंवाळी अधिवेशनाच्या कव्हरेज साठी.. अधिवेशनाचं रटाळ आणि एकसुरी कामकाज संपवल्यानंतर शनिवार - रविवार काय करायचं असा प्रश्न नेहमीच पडतो.. खाणावळी शोधून तरी किती शोधणार.. नागपूरातले जवळपास सगळी हॉटेल्स आतापर्यंत जीभेखालून गेलीयत, त्यामुळे शनिवार - रविवार नागपूराच्या बाहेर जायचा प्लान करत होतो.. मंत्री नितिन राऊतांशी बोलताना समजलं की वाशिम मध्ये काही युवकांनी एक चांगला प्रोजेक्ट केलाय, पाहण्यासारखा आहे. पूर्णत: कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेलं पण आता पंतप्रधानांचं पॅकेजच काय पण कुठलीही सरकारी कर्ज घेणार नाहीत म्हणणारं विदर्भातलं पहिलं गाव माझ्या निदर्शनास आलं.. इंटरेस्टींग वाटलं, म्हटलं जाऊन येऊयात, पण आता अशी पॉझीटीव्ह स्टोरी लागेल की नाही याची शाश्वती नव्हती. शेवटी दिल्ली शी बोललो.. एरव्ही मला आतापर्यंत मला नोकरी देणाऱ्या कुठल्याही चॅनेलने फिरू नको असं कधीच सांगीतलं नाही, आताही तसाच अनुभव आला... दिल्ली हून ओके मिळाल्यानंतर शनिवारी जायचं ठरलं. नकाशा किंवा जीपीएस च्या माध्यमातून रस्ते शोधत जाण्याचा माझा जुनाच छंद आहे. रस्त्यावर चालणाऱ्या माणसांना थांबवून प...