Skip to main content

संघठना-बिंगठना..

मित्रांनो,

सध्या तब्येत खराब आहे, तरी फार हलकं वाटतंय. सचिन परब ला मी सहज म्हटलं होतं की अनेक वर्षें मीं वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम केलं, पण एवढा ताण मला पुर्वी कधीच वाटला नव्हता. टीव्ही जर्नालिस्ट असोशिएशन चे सलग दोन वर्षे अध्यक्षपद मिरवल्यानंतरही आपण या पदावर नसल्याचे अजिबात दु:ख होत नाहीए।

झालंच तर सुटकेची भावना जास्त तीव्र आहे. संघटनेमध्ये कुठल्यातरी पदावर काम करण्याची माझी काही पहिली वेळ नव्हती, मात्र राजकारणाला तोंड देण्याची ही पहिली आणि कदाचित शेवटची वेळ होती। डोक्याची भजी झाली, लोकांना हँडल करताना..
          
           पत्रकारांवरील हल्ल्यांनी वर्ष गाजलं.. आमच्या विक्रोळी ऑफिसवर हल्ला झाला तेव्हा मीच गेलो पुढे मार खायला, अध्यक्ष-बिध्यक्ष असं काही मनात नव्हतं, पण वाटलं आपण जरा समजवून सांगू शकू त्यांना...उलटंच झालं..एक कानफडात बसली.. त्यांना थांबवायला गेलो तर दुसरी ही बसली.. आणि नंतर हल्लेखोरांनी वागळेंना घेरलं..मग काय झालं ते सर्वांनीच पाहीलं.. शिवसैनिकांनी पत्रकारांकडून एवढा मार..अगदी मरेस्तोवर मार कधीही खाल्ला नसेल.. कायद्याच्या भाषेतील सेल्फ डिफेन्स म्हणजे काय असतं ते जवळून पाहिलं..एरवी आपलं ठरलेलं असतं मार खायचं..
त्यानंतर हल्ल्यांची रांगच लागली.. हल्ल्यांमध्ये जातीपातीचं, धर्माचं, भाषेचं राजकारणही यायला लागलं..
तो मराठी होता म्हणून त्याचा आवाज लगेच उचलला गेला, तो मुस्लीम म्हणून त्याला मदत केली नाही, तो कॅमेरामन म्हणून रिपोर्टर्स पुढे आले नाहीत, तर कधी मार खाल्लेला पत्रकार छोट्या चॅनेलचा म्हणून तथाकथित मोठ्या चॅनेलच्या लोकांनी सपोर्ट केला नाही..हल्ल्यामधल्या या राजकारणाने डोकं भंजाळून गेलं होतं.. लवकरात लवकर पोहोचायचं म्हटलं तरी एवढ्या उशीरा कशाला तमाशा बघायला आला का असे काहीसे डायलॉग कानावर पडायचे.... कान किटले काही-बाही ऐकून..

ह्या आधी छात्रभारती आणि राष्ट्र सेवा दला मध्ये काम केलं, त्यावेळी ते काम एन्जॉय करता आलं..कधी ओझं वाटलं नाही..पत्रकारांच्या संघटनेचं अध्यक्ष बनण्याचं एक ओझं सतत खांद्यावर वाटायचं.. किती क्षुल्लक लोकांना महत्त्व द्यायला लागायचं.. पण कशासाठी..ते वोटर आहेत म्हणून.. छे.. वाटायचं ह्यांची जबाबदारी आपल्यावर आहे....

30 तारखेला मी संघटनेचा अध्यक्ष म्हणून शेवटची सर्वसाधारण सभा घेतली.. सर्व अपेक्षित होतं तसंच घडत होतं.. चार दोन टाळकी नीतिमत्ता, नियम आणि पारदर्शकता याच्यावर खल करत बसली..संपूर्ण संघटनेचा भार त्यांच्याच डोक्यावर होता..म्हणून हक्कांवर बोंबाबोंब करणाऱ्यांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं नाही त्याचं जास्त वाईट वाटतं....

संघटनेच्या एकंदरीतच भवितव्यावर गंभीर असणाऱ्यांना संघटनेशी संबंध जोडून घ्यायलाही आवडत नाही हे त्यांच्याच ई-मेल वरून स्पष्ट झालं.... मेल जोडलाय...।

Your first mail has tarnished my image in public by implying I’m a member of the said organisation, not having paid the annual fee for FY 2010-11. Your act was more serious as you declared me as a representative from NxxV (i.e. My Employer) when Managing Editor along with Resident Editor of this company has publically disassociated with the said Organisation. Thus, an open debate on this issue is in public interest and a chance to clarify my stand time to time.



तसंच कालच्या एजीएम मध्ये संघटनेकडे येणाऱ्या पैशांच्या बाबत फारच चिंता व्यक्त केली गेली..इन्टेन्शन पासून काही-काही...बापरे.. किती वेळ असतो लोकांकडे..यातील एकाही सदस्यांनी संस्थेला 5 पैशाची मदत कुठून आणून दिली नाही..पण मुद्दे..इतके की काम करणाऱ्या माणसाला काम करणं मुष्कील होऊन जाईल...आणि म्हणूनच संघटनेच्या अधिकृत इमेल आईडी वरून झालेलं

एक महत्त्वाचं संभाषण इथे जोडतोय... हे वास्तविक टीव्हीजेए च्या दोन तत्कालिन पदाधिकाऱ्यांमधील संभाषण आहे.. गुप्त नसावं कारण संघटनेच्या अधिकृत ई-मेल आईडी चा वापर करून हे संभाषण झालेले आहे, म्हणून संघटनेचा त्यावर पूर्ण हक्क आहे.  हेच लोक कधी काळी संस्थेकडे येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी पायघड्या टाकण्याबाबत चर्चा करत होते.. त्यांना आता संस्थेकडे आलेली देणगी पटत नाहीए... पोटशूळ उठलाय..... बरं ह्या सगळ्या गोष्ठींमागे त्या वेळी ही एकच विचार होता निवडणूकांचा....काही लोक केवळ निवडणूकांचांच विचार करतात..हे मी नाही बोलत..खाली दिलेले चॅट चे रेकॉर्ड वाचा..सगळं काही आपोआप समझेल..



-------------------------------------------------------------------------------------------------------------


From: Kaxxxsh Suxxr

Date: 2009/1/10

Subject: Chat with Kamxxsh Suxxr

To: tvjaonline@gmail.com


6:21 PM kamxxshsuxxr: katxe

raipur mayor cha kay / 


me: ha mayor kunachya tari madhyamatoon paise detoy mhane

6:22 PM kamxxshsuxxr: theek ahe...

me: yenarya laxmi la kadhi nahi mhanoo naye


kamxxshsuxxr: exactly


6:23 PM we shd aim at a corpus of 10 CR

me: aamen

kamxxshsuxxr: amen

inshallah

shd I mail u

6:24 PM that attachment

me: aapan tya denagicha cheque ghenaar aani tyaala pavati pan denaar aahot

kamxxshsuxxr: ho ho

me: MHADA attachment pathava asap

kamxxshsuxxr: bilkul

aapn 80 G certificate pan ghyava

ok

6:25 PM u'll get that in 5 mins

me: certificate kase ghyayache te sanga

nakki prayatn karu

6:26 PM shirke yani he karayala sangitale hotech

kamxxshsuxxr: apply with the charity commissioner

me: k

6:27 PM kamxxshsuxxr - pudhcha barsha nivadnukanche ahe


varsha* 



--------------------------------------------------------------------------------------------------------
आणखी काय बोलू.. सर्व समझलं असेलच.. गेले वर्षभर पदाच्या जबाबदारीमुळे काही गोष्टी बोलायची इच्छा असूनही बोलू शकलो नव्हतो.... आता मोकळा आहे..कुठल्याही संघटना - बिंगटनेचे टेन्शन नाही.... बरंच काही आहे बोलायचं... कदाचित बोलणार ही नाही...पण एक मात्र शिकलो...
मी माझ्या शत्रूंचा फार विचार करत बसलो..विलास आठवले मला सांगून थकला..सोडून दे म्हणून विचार करण... पण मला नाही जमलं..दुर्लक्ष करायला...

पण ह्या घटामोडीत जे लोक माझे होते..जवळचे होते... त्यांच्या कडे दुर्लक्ष झालं... पण ते सोबत राहिले.. शेवटपर्यंत...आणखी काय हवं....

Comments

Popular posts from this blog

How to earn Revenue from Digital News Media

    It’s all about Strategy!  Collaborate, engage, sell One question I often hear is: “What’s the revenue model for digital media or alternate news platforms?” The answer might seem complex, but it’s really quite simple: Monetize each bit!   Ravindra Ambekar, Media Expert  The digital landscape offers unparalleled opportunities to create, distribute, and earn from content. However, success demands a strategic approach. Here’s my take on how digital and alternate news media can thrive in this competitive space:   Monetize Every Bit of Content  Every piece of content—be it an article, video, or infographic—has the potential to generate revenue. Use ad placements, paywalls, subscriptions, or licensing to ensure no effort goes unrecognized or unrewarded.   Collaborate for Greater Reach Collaboration is the cornerstone of success. Partner with influencers, brands, and other media houses to expand your reach and diversify your revenue streams. Cros...

It’s Time for Semi-Rural Urbanization

  Don’t Welcome the Rat Race: It’s Time for Semi-Rural Urbanization   Having traveled across Maharashtra, I’ve seen it all—the bustling streets of Mumbai, the semi-urban chaos of mid-sized towns, and the forgotten corners of rural villages. There’s one glaring pattern: we are building an unsustainable future. Our cities are suffocating, and our villages are simmering with problems that could explode any moment.   Ravindra Ambekar with Dr Rajendra Singh inspecting water crisis  Just last week, Mumbai made headlines again for its pollution crisis. The air quality index (AQI) touched hazardous levels in several areas, making it almost impossible to breathe. Roads choked with vehicles, unchecked construction, and industrial pollution make this city—once known for its charm—one of the least livable urban centers in India. Yet, people continue flocking here, escaping rural struggles, only to sign up for life in a toxic gas chamber.   The Hidden Crises of Rural M...

Fragile Economy and Collapsed Morals: The State of Indian Media

Launching a web or digital news media platform in today's landscape mirrors the past fervor for starting evening newspapers. For many, it stems from sheer passion, occasionally supported by local political figures or funded personally. Mainstream media often excludes certain voices, either due to owner directives or political alignments, and these marginalized voices become the foundation of alternative media. Take MaxMaharashtra, for instance. The sentiment surrounding it is, “Jisaka koi nahi Usaka MaxMaharashtra." This encapsulates the role of alternative media: to serve those neglected by mainstream platforms. Running such media requires money, but more critically, it requires an unwavering passion. When individuals driven by a burning desire for change come together, the experiment of alternative media can thrive. Without this passion, financial woes can erode their influence over time. The economics of digital media revolve around online advertisements, aggregator platfor...