पत्रकारितेची चिंता... पत्रकारितेचं काय होणार याची सर्वांना चिंता लागली आहे, मला ही अंशी चिंता वारंवार सतावते. सरकार दमन करते म्हणून पत्रकारिता धोक्यात आहे असं म्हणणं मला धाडसाचं वाटतं. खर तर पत्रकारिता पत्रकारांमुळे सुद्धा धोक्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून मी नवोदीत तसंच वरिष्ठ पत्रकारांच्या नोकरीसाठी मुलाखती घेत आलोय. ओळख आहे म्हणून नोकरी मिळेलच अशा अपेक्षेने अनेक जण मुलाखत द्यायला येतात. मुलाखतींदरम्यान जे अनेक विषय माझ्या लक्षात आले ते थोडं संगतवार मांडण्याचा प्रयत्न करतो, मग पुढचा विषय मांडतो. मी सुद्धा नोकरीसाठी मुलाखती दिल्यायत. तो नर्वसनेस मी सुद्धा अनुभवलाय. काही ठिकाणी तर मला माझं प्रेझेंटेशनच करता आलं नाही. मी काय करू शकतो हे सांगता आलं नाही, आणि मी नोकरी मिळवण्यात फेल झालो. माझं म्हणणं असायचं की मला संधी द्या, आणि मी काय करू शकतो ते एकदा बघा, पण केवळ इतक्या भांडवलावर नोकरी मिळू शकत नाही हे मला टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसल्यानंतर समजायला लागलं. कॉन्फीडन्स हा भाग वगळला तरी काही बेसिक गोष्टी असतात ज्यावर पत्रकारांनी लक्ष दिल पाहिजे. काम करता करता कॉन्फिडन्स येऊ शकतो म्ह...