Skip to main content

Posts

Showing posts from April, 2016

तृप्ती ताई आता थांबा...

मंदिर प्रवेशासाठीचं आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यात प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष सहभाग मला घेता आला, तशी संधी मला मिळाली. मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशाच्या आंदोलनातील एक महत्वाचा मुद्दा विसरला जातोय, तो म्हणजे हे केवळ मंदिर प्रवेशाचे आंदोलन नाही, तर हे समानतेसाठीचं आंदोलन आहे. महिलांना समान अधिकार, वागणूक मिळावी म्हणून हे आंदोलन आहे. यात मंदिर प्रवेश हा एक सविनय कायदेभंग सारखंच हत्यार आहे. त्याला हवं तर सविनय रूढी- परंपरा भंग म्हणू. याचाच अर्थ आम्हाला कायदे नकोत असा नाही, आम्हाला कालबाह्य कायदे, रूढी परंपरा नकोत. असमानता शिकवणाऱ्या परंपरा तर अजिबात नकोत. मंदिरातला देव जर महिला, दलित यांच्या सहवासात बाटत असेल तर तो देव टाकला पाहिजे असं माझं मत आहे. तृप्ती देसाईंच्या आंदोलनाचं हसं करण्याचा प्रयत्न आजूबाजूला होत असल्याचं दिसतंय. यात गैर आणि चुकीचं काहीच नाही असं मानणारा मोठा वर्ग आहे. त्या वर्गाचं बौद्धीक घ्यावं असं मला वाटत नाही. त्यांना त्यांची चूक पुढे लक्षात येईल. या आंदोलनाला विनोदाचा, वैयक्तिक टीकेचा, आरोप- प्रत्यारोपाचा विषय करणारे हे त्यांच्या वंशपरंपरेला साजेसे वागत आह...