ठो ठो वाल्यांचा पराभव दाभोलकर- पानसरेंच्या हत्येनंतरही हिंदुत्ववाद्यांसमोरील आव्हानं संपलेली नाहीत. या दोघांच्या खुन्यांपर्यंत पोलिस पोहोचलेले नाहीत , नजीकच्या काळात पोहोचू शकतील अशी शक्यताही कमीच आहे. मधल्या काळातल्या सत्तांतराबरोबरच अच्छे दिन येतील असं वाटणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना दररोज कुणी ना कुणी टक्कर द्यायला उभा ठाकतोय. कालपरवा विचारवंत डॉक्टर एम एम कलबुर्गीना पण गोळ्या घातल्या. त्यांचा ही विचार समाजाला घातक होता म्हणे. गोळ्या खूप आहेत आणि टार्गेट ही... त्यामुळे हे कधी थांबणार , मारेकरी कधी पकडले जाणार वगैरे प्रश्न आता मला पडत नाहीत. बाकीच्यांची का पडतायत हे ही एक कोडंच आहे. खरं तर टार्गेट न संपणे हा एक प्रकारे दाभोलकर- पानसरे- कलबुर्गींच्या विचारांचा विजयच आहे. गांधी मारल्यानंतर पण टार्गेट संपले नाहीत हा पण गांधीचा विजयच आहे... तसं अगदी. विवेकवादी नेत्यांना अशा पद्धतीने मृत्यू येणं हे सभ्य समाजाला साजेसं नाही. सत्ता कुणाचीही असो. असे प्रकार घडत असतात. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकालात दाभोलकरांचा खून होतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कालखंडात पानसरेंना संपवलं जा...
Nothing to Lose...!!!