दादांच्या राजीनाम्या नंतर त्याच्या कारणांविषयी बरीच चर्चा झाली. दीदींनंतर दादांनी मागचा आठवडा गाजवला. दीदींच्या पाठोपाठ दादांचं बंड किंवा राजीनामा म्हणजे युपीए ला झटका औहे अशी चर्चा सुरू होण्याआधीच मोठ्या पवारांनी चर्चा संपवून टाकली. तरी सुद्दा पवारांच्या लेखी संपलेला हा विषय इथे संपला नाही तर इथून सुरू झाला असं सारखं सारखं वाटत होतं. दादांनी २५ ला राजीनामा दिला आणि २६ ला प्रफुल्ल पटेलांनीी सांगीतलं की ंआता यापुढे सरकार मध्ये कुणीही उपमुख्यमंत्री असणार नाही. पादुका सिंहासनावर ठेऊन राज्य करेल असा भरत सापडला नाही म्हणून की काय किंवा आता रामालाच पादुका देण्याची इच्छा उरलेली नाही म्हणूनही असेल कदाचीत पण उपमुख्यमंत्री पद दादांसाठीच राखीव ठेवल्याचं स्पष्ट करून एनसीपी ने जवळपास जाहीर केलं की त्यांना पक्षात काही पंगा घडवून आणायचा नाहीए, टार्गेट काही औरच आहे. दादांच्या राजीनाम्यामागचं खरं राजकारण अजूनही बाहेर आलं नाही. हळूहळू ते बाहेर येइलच याची काही ग्यारंटी नाही. एरवी मीडीया मध्ये दादा आणि ताईच्या मध्ये "x" अशी फुल्ली मारून बातम्या चालवण्याची पद्धत रूढ झाली होती, अशा फुल्लीच्या...
Nothing to Lose...!!!