मोरल ग्राउंड
आझाद मैदानावर बऱ्याच दिवसांनी नॅशनल चॅनेलच्या ओबी व्हॅन आंदोलनाच्या बातम्या कव्हर करताना दिसल्या. आज मी पत्रकार म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून .. सकाळी मेधाताईंशी फोनवरून बोलणं झालं. तिकडे अण्णांच्या आंदोलनालाही ग्लॅमर आलंय.काहीतरी होईल असं वाटतंय आता.. जोर लावला पाहिजे. आझाद मैदानावर दोन भिन्न क्लासेसची गर्दी.. मेधा पाटकरांच्या तंबूत एसआरए पिडीत झोपडपट्टीवासीयांची गर्दी तर बाजूला अण्णांच्या समर्थनार्थ मोठा तंबू लागलेला. पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले बरेच अनोळखी चेहरे भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज बुलंद करत होते. तिकडे फेसबुक आणि ट्वीटरवर ही भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी होण्यासाठी मेसेज फिरत होते..पण आझाद मैदानात त्यांपैकी कोणी फिरकलं नाही. संध्याकाळी आमीर खाननं ही अण्णांच्या पाठिंब्यादाखल पत्रक काढलं..पंतप्रधानांना अण्णांच्या आंदोलनाची दखल घेण्याची विनंती केली..
सगळं जुळून येतंय असं वाटतंय. भ्रष्टाचार करणारी माणसंही भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलताना दिसतायत. भ्रष्टाचार केला नाही असा माणूस आहे का जगात.. पण भ्रष्टाचाराच्या कमाल मर्यादा ओलांडून पुढे निघालेल्या राजकीय व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी हिच खरी योग्य वेळ आहे.
दखलपात्र होणं हे ही फार महत्त्वाचं आहे.
कित्येक वर्ष प्रामाणिकपणे आंदोलन करणारे हे नेते अनेकवेळा हेटाळणी,चेष्टेचा विषय झालेली ही मी पाहीलीयत. मेधा पाटकर हट्टी आहेत..विकासविरोधी आहेत...अण्णा राजकारण्यांच्या इशाऱ्यावर चालतात.. वगैरे वगैरे प्रतिक्रीया ही अनेकवेळा ऐकल्यायत. मग अशा लोकांच्या शब्दांना अचानक एवढी धार आली कशी की भ्रष्ट राजव्यवस्थेचे तुकडे पडतील की काय अशी शंका निर्माण व्हावी...

सकाळी विक्टर, हर्षद आणि मी आझाद मैदानाकडे जायला निघालो. दादरला चहा पिण्यासाठी थांबलो थोडा वेळ.. विक्टर त्याला अंधांसाठी असलेल्या कोट्यातून 200 फूटांची जागा व्यवसायासाठी मिळावी म्हणून कित्येक वर्ष मंत्रालयाचे खेटे घालतोय. पण त्याला पॉलीसी शिकवली जातेय. भवन्स कॉलेज जवळ त्याला मिळालेलं झुणका भाकर केंद्र आता योजना बंद झाल्यामुळे परत घेतलं जातंय. तीच जागा त्याने मागीतली तर आता ती जागा आरक्षित झालीय म्हणून उत्तर दिलंय. आदर्श आणि इतर मोठ्या इमारतींसाठी किती आरक्षणं उठवली याचा हिशेब विक्टरला हवाय. आम्ही अशीच चर्चा करत होतो.. या आधी भ्रष्टाचार मुद्दा का नव्हता.. तर जो पर्यंत माणूस स्वत: भ्रष्टाचाराचा विक्टीम बनत नाही तोपर्यंत त्याला हा इश्यू आपलासा वाटत नाही. मग एवढे दिवस लोक काही भ्रष्टाचाराचे विक्टीम नव्हते का.. तर होते..पण आता भ्रष्टाचाराच्या मार्गात ही फसवणूक वाढलीय. पैसे दिले तरी काम होईलच अशी शाश्वती नाही. बरं सगळ्याच गोष्ठींसाठी पैसे मोजायचे मग जगायचं कसं... आणि त्यातल्या त्यात ज्यांना संरक्षणाची जबाबदारी सोपवलीय त्यांना जाब विचारायची सोय नाही..
ज्यांना निवडून दिलंय ते जनतेला मोजेनासे झालेयत. जे निवडून देतात ते निवडणूकीत हरी - लाल पत्ती घेऊन गप्प बसतात...जाब कोणी आणि कोणाला विचारायचा.. मोरल तर असलं पाहिजे ना..
असं मोरल असलेला चेहरा जेव्हा या आंदोलनाला मिळाला तेव्हा हा इश्यू वाटायला लागला.
अण्णा आजचे गांधी आहेत असं मी मानत नाही. गांधींच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतायत एवढं मात्र नक्की..
कधी कधी राजकारणी त्यांची दिशाभूल ही करतात. राजकारण्यांची एक फळी त्यांच्याशी चांगले संबंध बनवण्यासाठीच ठेवलेली आहे. पण अण्णा भ्रष्ट नाहीत, हेच त्यांचं हत्यार.. म्हणूनच अण्णांच्या आंदोलनाला शस्त्राची धार आलीय आणि म्हणूनच पुन्हा एकदा आझाद मैदान हरं-भरं दिसायला लागलंय.
आझाद मैदानात फिरताना आणखी एक छोटंसं आंदोलन दिसलं. छोटंस यासाठी की त्या इश्यूवर आवाज उठवण्याचं नाटक करून अनेक लोक मोठी झाली. आंदोलन होतं मराठी शाळा जगल्या पाहिजेत म्हणून... पुण्यातल्या कर्वेनगरातील 50-60 छोटे विद्यार्थी आंदोलनाला बसलीयत. सहज म्हणून त्यांच्याही तंबूत गेलो आणि मुलांशी गप्पा मारल्या...
मुलांना शाळा बंद का होतायत यातलं फार काही कळत नव्हतं.. पण बहुधा त्यांची ही पहिलीच मुंबई वारी होती आणि त्यांचं मुंबई बद्दलचं आकर्षण त्यांना काही लपवता येत नव्हतं. फाइनल झाली ते वानखेडे स्टेडीयम कुठे आहे...इथपासून तुमच्याकडे दोन मोबाईल फोन का ..त्याच्या किंमती काय आणि दोन मोबईलचं बिल परवडतं का.. इथपर्यंत अनेक प्रश्न विचारले...
तेवढ्यात एक छोटंस पोरगं पुढं आलं आणि बोललं.. सकाळपासून आलोय इथं.. उद्धव आणि राज ठाकरे कुठे राहतात. ते का नाही येत आमच्याबरोबर बसायला इथं...
अनपेक्षितच...
छोटीचं पोरं.. वानखेडेचं ग्राउंड आणि मोरल ग्राउंड मधला फरक त्यांना कसा सांगू याची जुळवा जुळव करत त्यांच्या शिक्षकांकडे विजिटींग कार्ड चिटकवत मी ही सटकलो...
माझी मुलं इंग्रजी मिडीयम मध्ये शिकतात..मला तरी कुठंय मोरल ग्राउंड तिथे बसण्याचं....
Comments
आपल काम झाल बस्स !!, हि प्रवृत्ती जो पर्यंत जात नाही तो पर्यंत काही होणार नाही.
भ्रष्टाचारा बद्दल सगळ्यांना चीड आहे पण, जेव्हा आपल काम होत नाही तेव्हा.
जर पैसे भरून आपल काम झाल कि चिडीचूप होतो आपण , त्यावेळी बोलेल का कोण ??
काही तरी केल पाहिजे !! रवी सर, पण नक्की काय करायचं हा यक्ष प्रश्न आहे ?
भारतीय तरुणांसमोर हा मोठा प्रश्न उभा आहे अण्णांच्या आंदोलनाने एक दिशा मिळाली आहे. बघू आता तरी सरकार जागे होईल काय ?
- कृष्णदर्शन जाधव