मध्यंतरी नागपूर ला गेलो होतो हिंवाळी अधिवेशनाच्या कव्हरेज साठी.. अधिवेशनाचं रटाळ आणि एकसुरी कामकाज संपवल्यानंतर शनिवार - रविवार काय करायचं असा प्रश्न नेहमीच पडतो.. खाणावळी शोधून तरी किती शोधणार.. नागपूरातले जवळपास सगळी हॉटेल्स आतापर्यंत जीभेखालून गेलीयत, त्यामुळे शनिवार - रविवार नागपूराच्या बाहेर जायचा प्लान करत होतो.. मंत्री नितिन राऊतांशी बोलताना समजलं की वाशिम मध्ये काही युवकांनी एक चांगला प्रोजेक्ट केलाय, पाहण्यासारखा आहे. पूर्णत: कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेलं पण आता पंतप्रधानांचं पॅकेजच काय पण कुठलीही सरकारी कर्ज घेणार नाहीत म्हणणारं विदर्भातलं पहिलं गाव माझ्या निदर्शनास आलं.. इंटरेस्टींग वाटलं, म्हटलं जाऊन येऊयात, पण आता अशी पॉझीटीव्ह स्टोरी लागेल की नाही याची शाश्वती नव्हती. शेवटी दिल्ली शी बोललो.. एरव्ही मला आतापर्यंत मला नोकरी देणाऱ्या कुठल्याही चॅनेलने फिरू नको असं कधीच सांगीतलं नाही, आताही तसाच अनुभव आला... दिल्ली हून ओके मिळाल्यानंतर शनिवारी जायचं ठरलं. नकाशा किंवा जीपीएस च्या माध्यमातून रस्ते शोधत जाण्याचा माझा जुनाच छंद आहे. रस्त्यावर चालणाऱ्या माणसांना थांबवून प...
Nothing to Lose...!!!