ऑनलाइन शाळा बंद करा कोरोना मुळे जगातील अनेक देशांचे व्यवहार ठप्प पडलेयत. सरकारची अधिवेशनं, बैठकाही होत नाहीयत अशा वेळी शाळा मात्र अट्टाहासाने सुरू ठेवल्या जात आहेत. शाळा सुरू ठेवण्यामागे शिक्षण सुरू ठेवणं ही भूमिका नाहीय, तर शाळेची फी सुरू राहिली पाहिजे अशी भूमिका दिसतेय. "ऑनलाइन शाळा या पालकांना लुटण्याचं साधन आहेत. केवळ फी घेण्यासाठी या शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. पालकांकडून फी घेण्यावर बंदी घालण्यात यायला हवी, शाळांच्या स्टाफच्या पगारासाठी सरकारने अनुदान द्यायला हवं." मी जितक्या लहान मुलांना ऑनलाइन शिक्षण घेताना पाहिलंय, त्यावरून ही मुलं काही रिसिव्ह करत आहेत असं दिसत नाही. अनेकदा तर मुलांना मी कानात हेडफोन लावून झोपलेलं पाहिलंय. सलग पाच - सहा तास ऑनलाइन शाळा भरवण्याचा अट्टाहास हा केवळ फी साठी आहे. यात शिक्षणाबाबतची आत्मीयता मला कुठेच दिसत नाही. शिक्षक ही या ऑनलाइन शिक्षणासाठी सरावलेले नसल्याने सदैव गोंधळलेलेच असतात. ऑनलाइन ट्रेनिंग साठी आवश्यक स्लाइड नसणे, इनोवेटीव पद्धतीचा अभाव, एकेका ऑनलाइन क्लास मध्ये असलेली दोन-तीन तुकड्यांची मुले, सलग भाषण यामुळे मुल...