मा. शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. पत्र लिहिण्यास कारण की तुमच्या सध्याच्या राजकारणावरून मला काही प्रश्न पडलेयत. नेहमीप्रमाणे साहेबांना सर्व माहित असतं असं तुमच्या भक्तांकडून कळलं आणि विचार केला की थेट तुम्हालाच हे प्रश्न विचारावेत. तुम्ही सतत बेरजेचे राजकारण करत आलात, त्यामुळे तुमच्या राजकारणाचा आवाका कुणालाच लक्षात आला नाही. बेरीज करता करता तुम्ही इतके पुढे गेलात की नेमकं तुम्ही काय काय जोडलंय हे ही तुमच्या लक्षात राहिले नसावं. अर्थात यालाही तुमचे भक्त आक्षेप घेतील. साहेबांना सर्व माहित असतं, आणि त्यांच्या लक्षात सर्व असतं अशी त्यांची पक्की धारणा आहे. असो, तो काही आपला विषय नाही. गेली अनेक वर्षे तुम्ही राज्यातील पुरोगामी राजकारणाचा चेहरा आहात. संघ परिवारावर थेट, आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुरोगामी चळवळीतले लाखों कार्यकर्ते, कुठेच काही नाही झालं तर आहेत पवार साहेब, म्हणत थेट तुमच्या दारात यायचे. तुम्ही ही मोठ्या मनाने त्यांना सामील करून घेतलं. तुमचा पक्ष वाढत गेला. मग हळूहळू हा पक्ष नसून टोळी आहे असा आरोप विरोधी पक्षांनी सुरू केला. तुमच्यावरचा हल्ला म्हणजे पुर...
Nothing to Lose...!!!