Skip to main content

Posts

Showing posts from May, 2016

या महाराष्ट्राला आग लावा...!

या महाराष्ट्राला आग लावा...!  जय महाराष्ट्र, दगडांच्या देशा कणखर देशा... बघतोयस काय रागानं महाराष्ट्र मिळवलाय वाघानं अशा विविध संदेशांनी आपली छाती फुगत चालली आहे असं वाटत असेल तर आपल्याच कानाखाली दोन चार चापटी मारून भानावर या. अशाच तुताऱ्यांनी या महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलंय. या तुताऱ्यांच्या आवाजाखाली अनेक आवाज दबले गेले आहेत. ते ऐकले तर आपण ज्याला अभिमानास्पद बोलतो तो अभिमान किती पोकळ आहे हे ही लक्षात येईल. एखाद्या चांगल्या दिवशी काही तरी वाईट बोलायची खोड असते काही लोकांना, तशी ती मलाही आहे. त्यामुळेच आजच्या चांगल्या दिवशी वाईट बोलायचं ठरवलंय. सामान्यतः आपण ज्या भूप्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा अभिमान आपल्याला असतो. हा अभिमान कधी कधी त्या भूप्रदेशाच्या विकासाला दिशा देतो किंवा मग त्या प्रदेशातील अनेक गैरव्यवस्थांवर पांघरून घालायचं काम करतो. एकदा का हा अभिमान आपण स्वीकारला की मग अनेक गोष्टींची चर्चा करायची नाही आणि पुढे जायचं असं गृहीत धरलेले असते. सामान्य माणूस सामान्यतः आपला फायदा काय होणार आहे याचा व्यापक किंवा सूक्ष्म हिशोब लाऊन आपापल्या कुवतीप्रमाणे आपला प्रकार निवडत ...