Skip to main content

Posts

Showing posts from March, 2016

Half Chaddhi

हाफ चड्डी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वत:चा गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला. खाकी अर्धी चड्डी ही संघाची ओळख बनली होती. कालानुरूप त्यात बदल केला ही स्वागतार्ह गोष्ट आहे. तरूणांना आकर्षित करण्यासाठी किंवा आपण काळासोबत आहोत हे दाखवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. संघाने काळाची पावले उशीरा ओळखली. चड्डी बदलायला वेळ लागला. यावेळी देश आए आता दुरूस्त पण या असं आवाहन करण्याचा मोह अनेक पुरोगाम्यांना झाला. मला पण झाला पण मी तो आवरला. चड्डी हा केवळ संघाचा गणवेश नाही विचारधारेचं प्रतिक बनली होती. हा देश हाफ चड्डी वाल्यांच्या हातात देणार का ? असं एखादा नेतां भाषण करतो तेव्हा त्याचा अर्थ संघ असा असतो. त वरून ताकभात तसं चड्डी म्हटलं की संघी मानसिकता असं ओळखायचं. चड्डी वाल्यांच्या फुलपँटवाल्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसू शकता पण पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला हाफचड्डी टेस्ट पास करावी लागते. हाफचड्डी ला जो जास्त शिव्या देईल तो जास्त पुरोगामी... असं काहीसं समीकरण डोक्यात असल्याने मोठी स्पर्धा लागलेली दिसते मधल्या काळात. दरम्यानच्या काळात संघ वाढला, संघाचा प्रभाव वाढत असताना संघाला विरोध ...