Skip to main content

Posts

Showing posts from September, 2013

who killed Narendra Dabholkar

नरेंद्र दाभोलकरांची हत्या कोणी केली, हा प्रश्न ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. सध्या सरकारही ह्या प्रश्नाचं उत्तर शोधतंय. विवेकवादी चळवळही पुन्हा एकदा आत डोकावून शोधायला लागलीय... एकमेकांना हाक देऊन जागवायला लागलीय.... असं काही घडलं की सारे एकत्र येतात.. पुन्हा लढायच्या आणा-भाका घेतात..बस्स... दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले.. कोणी मारलं असेल.. दाभोलकरांना जे लोक जवळून ओळखायचे त्यांचा तर ह्या घटनेवर-दुर्घटनेवर विश्वासच बसला नाही..एक माणूस जो सतत कुठेही डोक्याचा पारा न चढवता अंधश्रद्धा विरोधी काम करतो.. अनिष्ट प्रथांना आव्हान देतो.. लोकांच्या मनातले गैरसमज दूर करतो.. कुठेही आक्रस्ताळे पणा नाही.. आरडा ओरडा नाही.. अशा माणसाला कोण आणि कशाला मारू शकेल...पण त्यांना डोक्यात गोळी मारून दोघा बाईकस्वारांनी मारलं... कदाचित मारेकरी दाभोलकरांचा सामना करायला घाबरले असावेत म्हणून त्यांनी मागून गोळी मारली.. दाभोलकरांच्या हत्येनंतर खडबडून जागं होत सरकारनं जादूटोणा विरोधी अध्यादेश काढला.. अब्रू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न.. पण त्यानंतर दाभोलकरांची वेगवेगळ्य़ा स्तरावर हत्या करण्या...